Lightning Strike Temple: वीज कडाडली अन् देवस्थानात कहर, मंदिराच्या कळासाला तडे, उपकरणांचे नुकसान

Last Updated:

धाममणीच्या जागृत देवस्थान असणाऱ्या गणिश मंदिरावर वीज कोसळली. धामणी येथील द्रोणागिरी मळ्यात सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

News18
News18
पुणे: आंबेगाव तालुक्यात धाममणीच्या जागृत देवस्थान असणाऱ्या गणिश मंदिरावर वीज कोसळली. धामणी येथील द्रोणागिरी मळ्यात सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. विजेची तीव्रता अधिक असल्याने बॉम्बस्फोट झाल्यासारखा आवाज झाला. कळसाचे सिमेंटचे तुकडे आजूबाजूंच्या घरांवर पडले. कळसाच्या बांधकामाला तडे जाऊन खड्डा पडल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे.
द्रोणगिरी मळ्यातील गणेश मंदिर जागृत देवस्थान आहे. गणेश मंदिराच्या जवळच लोकवस्ती आहे. सोमवारी पहाटे वीज कोसळल्याच्या आवाजाने लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. मंदिरात काही मजूर झोपलेले होते परंतु, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असेही गावकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात विजांसह मुसळधार पाऊस झाला. देवस्थानवर वीज कोसळल्याच्या दुर्घटनेत मंदिराच्या कळसाचे नुकसान झाले आहे. कळसाला तडे गेले असून विद्युत उपकरणांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Lightning Strike Temple: वीज कडाडली अन् देवस्थानात कहर, मंदिराच्या कळासाला तडे, उपकरणांचे नुकसान
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement