Mumbai Weather: मुंबईवर पावसाचं संकट, कोकणातही मुसळधार कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला अक्षरशः झोडपून काढलं आहे. काल मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागला होता.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला अक्षरशः झोडपून काढलं आहे. काल मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागला होता. तसेच रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली होती. आज 16 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कोकणातील रायगड जिल्ह्यात आज सर्वात मोठा इशारा देण्यात आला आहे. रायगडला आज रेड अलर्ट देण्यात आला असून, अत्यंत जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाचा जोर राहणार आहे. येथे मध्यम ते मुसळधार सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.










