Gautami Patil: 'या क्षेत्रात येऊ नका...', लाखोंच्या सुपाऱ्या घेणाऱ्या गौतमी पाटीलचा मुलींना अजब सल्ला, नेमकं काय म्हणाली?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Gautami Patil: आज अनेक लहान मुली आणि तरुणी गौतमीला आपला आदर्श मानून या क्षेत्रात येऊ पाहत आहेत. पण गौतमीने त्यांना एक कानमंत्र दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गौतमी पाटील आणि ट्रोलिंग हे जणू समीकरणच बनलंय. पण आता या ट्रोलर्सना ती जुमानत नाही. ती सांगते, "मी मुख्य प्रवाहातील अभिनेत्री नसल्याने मला जास्त ट्रोल केलं गेलं. सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, पण आता माझ्या टीमच्या आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे मी खंबीर झाली आहे. नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयावर लक्ष देणं हीच माझी ताकद आहे."
advertisement
advertisement
ती म्हणाली, "मी सांगते पोरींनो, फक्त स्टेजवरचं ग्लॅमर बघून या क्षेत्रात उडी घेऊ नका. त्यामागे प्रचंड संघर्ष आहे. नृत्य करायचं असेल, तर व्यावसायिक डान्स क्लासमध्ये जा. एका लहान मुलीने मला विचारलं की मला तुझ्यासारखं नाचायचं आहे, तेव्हा मी तिला सांगितलं, आधी तुझं शिक्षण पूर्ण कर. शिक्षणाशिवाय आणि मेहनतीशिवाय इथे शॉर्टकट नाही."
advertisement
advertisement










