advertisement

IPL 2026 : बीसीसीआयला 'मिडल इस्ट' युद्धाचं टेन्शन नाही, पण... आयपीएलकरता वेगळंच चॅलेंज!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहते आयपीएल 2026 ची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

बीसीसीआयला 'मिडल इस्ट' युद्धाचं टेन्शन नाही, पण... आयपीएलकरता वेगळंच चॅलेंज!
बीसीसीआयला 'मिडल इस्ट' युद्धाचं टेन्शन नाही, पण... आयपीएलकरता वेगळंच चॅलेंज!
मुंबई : टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहते आयपीएल 2026 ची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि एमएस धोनी हे टीम इंडियाचे महान खेळाडू आयपीएलमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज आहेत, पण अजूनही आयपीएलचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही. आयपीएल 2026 चा मोसम 28 मार्चला सुरू होणार आहे, तर स्पर्धेची फायनल 31 मे रोजी होईल.
येत्या एक ते दोन दिवसांमध्ये आयपीएलचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. यंदाच्या आयपीएलची घोषणा दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या 20 दिवसांच्या वेळापत्रकाची घोषणा 12 किंवा 13 मार्चला होईल, असं देवजित सैकिया म्हणाले आहेत. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आयपीएल 2026 च्या वेळापत्रकाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाईल.
advertisement
या उन्हाळ्यात तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यामुळे आयपीएलच्या 3 ते 4 सामन्यांवर या निवडणुकीच्या तारखांचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
'काही केंद्रांकडून आम्ही पुष्टीची वाट पाहत आहोत, त्यानंतर आम्ही पहिल्या टप्प्याच्या तारखा जाहीर करू', असं सैकिया म्हणाले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीच्या 2 मॅच रायपूरमध्ये होणार आहेत, त्यामुळे रायपूरमध्ये पहिल्यांदाच आयपीएल सामन्यांचं आयोजन करण्यात येणार आहे.
advertisement

युद्धाचं टेन्शन नाही, पण वेगळंच चॅलेंज

दरम्यान इराण आणि आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. तसंच आयपीएल खेळण्यासाठी युएईमार्गे येणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू भारतात कसे येणार? याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे, पण बीसीसीआयसाठी युद्ध नाही तर विधानसभा निवडणुका चिंतेचा विषय आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर संपूर्ण आयपीएल वेळापत्रक जाहीर केलं जाईल, तसंच आयपीएलचा हंगाम 31 मे नंतर वाढणार नाही, असंही सैकिया यांनी स्पष्ट केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : बीसीसीआयला 'मिडल इस्ट' युद्धाचं टेन्शन नाही, पण... आयपीएलकरता वेगळंच चॅलेंज!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement