advertisement

Zakir Khan: 'कॉमेडी सोडायची नाही, फक्त...' अखेर झाकीर खानने सांगितलं स्टँडअपपासून ब्रेक घेण्याचं खरं कारण

Last Updated:

Zakir Khan On Break: झाकीरने एका कार्यक्रमामध्ये माध्यमांसोबत बोलताना त्याने कॉमेडीतून नेमका ब्रेक का घेतला आहे? याचं कारण चाहत्यांना सांगितलं आहे.

झकिर खान
झकिर खान
मुंबई: सुप्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खाननं (Comedian Zakir Khan) गेल्या काही दिवसांपूर्वी काही काळासाठी कॉमेडीतून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यावेळी झाकीरनं आजारपणाचा हवाला देत ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं होतं.. आता अशातच झाकीरने एका कार्यक्रमामध्ये माध्यमांसोबत बोलताना त्याने नेमका का कॉमेडीतून ब्रेक घेतला आहे, याचा उल्लेख केला आहे. झाकीरनं त्या कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलं की, मी माझ्या सर्वात आधी आरोग्याला प्राधान्य देऊ इच्छितो आणि त्याने नेमकं किती वर्षांसाठी ब्रेक घेतोय, याचा सुद्धा त्याने उलगडा केला आहे.
एका कार्यक्रमामध्ये माध्यमांसोबत बोलताना झाकीर खान म्हणाला की, "मला कॉमेडी अजिबात सोडायची नाही. मला फक्त कॉमेडीतून ब्रेक घ्यायचा आहे. मला थोडा वेळ एका विद्यार्थ्यासारखे जगायचे आहे. मला माझ्या आरोग्यावर जरा लक्ष द्यायचे आहे. मला स्वत:वर बराच वेळ घालवायचा आहे आणि तो वेळ दीड ते दोन वर्षांचा असेल. मला या ब्रेकच्या काळात भारत दौरा करायचा आहे, त्यामुळे त्यासाठी खूप वेळ लागू शकतो." झाकीर खानच्या विधानावरून स्पष्ट होते की तो स्टँड-अप कॉमेडीपासून थोडा वेळ काढून त्याला त्याच्यासाठी इतर गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत.
advertisement
पुढे बोलताना झाकीर असाही म्हणाला की, मला नेहमीच माझ्यासोबत लोकं जोडलेले वाटतात. म्हणून तो या ब्रेकला नाटक म्हणत नाही. या ब्रेकच्या काळात झाकीर त्याच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करू इच्छितो, त्याला स्वतःला एक्सप्लोअर करायचे आहे आणि त्याला भारत फिरायचा आहे. तो म्हणाला की, संपूर्ण भारतात प्रवास करण्याची योजना आखत आहे, म्हणून त्याने दोन वर्षांचा ब्रेक घेतलेला आहे. झाकीरने जेव्हा कामातून ब्रेक घेण्याची घोषणा केली होती तेव्हा त्याच्या हेल्थबद्दल सोशल मीडियावर बऱ्याच अफवा पसरल्या होत्या.
advertisement
अनेक मिडिया रिपोर्ट्समध्ये त्याला गंभीर आजार असल्याचे म्हटले होते. त्यांनी असे सर्व दावे फेटाळून लावत त्याला कोणताही गंभीर आजार झालेला नाही, असं स्पष्ट केले. शेवटी झाकीर म्हणाला की, "ब्रेक घेण्यामागे अशी स्टोरी अशी आहे की, माझ्याकडे खूप लिखाणाचं काम बाकी आहे. जे मी गेल्या सहा वर्षांपासून करू शकलो नाही. माझी तब्येत थोडीशीच बिघडली आहे, खूप जास्त नाही."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Zakir Khan: 'कॉमेडी सोडायची नाही, फक्त...' अखेर झाकीर खानने सांगितलं स्टँडअपपासून ब्रेक घेण्याचं खरं कारण
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement