कोकणातील 'सिद्धार्थवाडी', फक्त नावच नाही खरंच आहे अभिनेता सिद्धार्थ जाधवशी खास कनेक्शन

Last Updated:
स्वर्गाहून सुंदर कोकणातील एका गावात सिद्धार्थवाडी नावाची एक वाडी आहे. या वाडीचं अभिनेता सिद्धार्थ जाधवशी खास कनेक्शन आहे.
1/9
कोकण म्हटलं की अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. कोकण म्हणजे स्वर्गसुख. कोकणात एक तरी घर असावं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. कोकणात जायचं म्हणजे वेगळीत चंगळ असते. कोकण आणि कोकणातील निसर्ग नेहमीच मनं जिंकून जातो.

advertisement
2/9
कोकणात अनेक गावं आहेत. प्रत्येकाला त्याच्या गावाचा अभिमान आहे. प्रत्येकाच्या गावाची एक खासियत आहे. कोकणात सिद्धार्थ नावाची एक वाडी आहे. ही वाडी फक्त नावापुरती नाही तर प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवशी या वाडीचं खास कनेक्शन आहे. 

3/9
अभिनेता सिद्धार्थ जाधवचं शिक्षण आणि करिअर मुंबईत झालं असलं तरी त्याचा जन्म मात्र कोकणातील आहे. त्याच्या वडिलांना मुंबईत नोकरी लागल्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईत शिफ्ट झालं. सिद्धार्थचं बालवाडीचं शिक्षण हे कोकणात झालं.

4/9
कोकणातील त्याच्या गावी असलेल्या वाडीला चक्क त्याचं नाव देण्यात आलं आहे. सिद्धार्थच्या नावावरून त्यांच्या वाडीचं नाव सिद्धार्थ वाडी असं ठेवण्यात आलं होतं. सिद्धार्थने स्वत: याबद्दल सांगितलं. 

5/9
सिद्धार्थचा कैरी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा कोकणात शूट करण्यात आला आहे. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्तानं बोलताना सिद्धार्थने त्याच्या कोकणातील आठवणींना उजाळा दिला.

6/9
राजश्री मराठीशी बोलताना सिद्धार्थ जाधवने सांगितलं,
राजश्री मराठीशी बोलताना सिद्धार्थ जाधवने सांगितलं, "18 वर्षांनी मी माझ्या मुलींना कोकणात घेऊन गेलो. तेव्हा ST ने जायचो आता ट्रेन जातोय. कोकण आहे तचं पण आता आणखी डेव्हलप झालंय. मी आंबे खाण्यापासून, फणस चोरण्यापर्यंत, मासे पकडायचो, विटी दांडू खेळायचो अशा अनेक गोष्टी केल्या."
advertisement
7/9
 "मी माझ्या बालवाडीच्या शाळेत गेलेलो. अजूनही कोकण तसंच आहे. चिऱ्याची घरं, लाल माती, मजा येते. केळवली, राजापूर, खारेपटाण."

8/9
सिद्धार्थनं त्याच्या गावच्या वाडीविषयी सांगितलं. तो म्हणाला,
सिद्धार्थनं त्याच्या गावच्या वाडीविषयी सांगितलं. तो म्हणाला, "माझं केळवली आणि माझ्या वाडीचं नाव सिद्धार्थ वाडी. आमच्या वाडीला माझं नाव आहे. असं म्हणतात की, मी आईच्या पोटात होतो तेव्हा वाडीचं नाव ठेवायचं होतं. जर रामचंद्रला मुलगा झाला तर त्याचं नाव वाडीला देऊ म्हणून सिद्धार्थ वाडी."
advertisement
9/9
 "कोकण माझ्या जवळ आहे. नाटका प्रयोगांच्या दौऱ्यांच्या निमित्तानं प्रत्येकवेळी कोकणात जायला मिळतं. आताही कोकणात ती ऊब आहे. हॉटेल्स वगैरे सगळं झालं आहे पण गावाचा रस्ता धरला की, झाडी, मातीचा सुगंध, हवा असते की कमाल असते", असंही तो म्हणाला. 

Sharad Pawar : निवडणुकीआधी लवासा प्रकरणात नवी अपडेट, शरद पवारांविरोधातील याचिकेवर हायकोर्टात मोठी घडामोड
निवडणुकीआधी लवासा प्रकरणात नवी अपडेट, शरद पवारांविरोधातील याचिकेवर हायकोर्टात मो
  • निवडणुकीआधी लवासा प्रकरणात नवी अपडेट, शरद पवारांविरोधातील याचिकेवर हायकोर्टात मो

View All
advertisement