किनवट नगर परिषद
– भाजपा आमदार भिमराव केराम यांना धक्का
– नगराध्यक्षपदासाठी ठाकरे गटाचे उमेदवार सूजाता एड्रलवार ४ हजाराहून अधिक मतांनी विजयी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात निवडणूकीला गालबोट…
विजयी मिरवणूकीवर दगड फेक…
शिरपूर शहरातील वाल्मीक नगर भागात दगड फेक…
घटनास्थळी पोलीस दाखल…पोलिसांकडून धरपकड सुरू…
अंबरनाथ मधून शिवसेनेने खाते उघडलं
वॅार्ड नंबर १० ब मधून शिवसेनेचे राहुल सोमेश्वर विजयी
हिंगोली जिल्ह्यातील तीन नगरपरिषदेपैकी हिंगोली आणि कळमनुरी नगरपरिषद नगराध्यक्षपदी शिवसेना विजयी
वसमत नगरपरिषद नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी, भाजप आणि महाविकास आघाडी शून्यावर
अहिल्यानगर जिल्ह्यात दादा भुईसपाट, काकांचाही सुपडा साफ, एकही नगराध्यक्ष नाही
भाजपच्या घराणेशाहीला मतदारांनी नाकारलं, BJP उमेदवारासह घरातील 6 जणांना लोकांनी पाडलं!
गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज नगरपालिकेवर भाजपने स्पष्ट बहुमत मिळवल असून भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार लता सुंदरकर विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी भाजपचे 12 उमेदवार विजयी झाले आहेत तर काँग्रेसला सहा जागांवर समाधान मानाव लागला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन उमेदवार निवडून आले आहेत.निकाल जाहीर होताच भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास विजयी उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष केला. देसाईगंज मध्ये भाजपच्या या विजयाबद्दल गुलाल उधळत जल्लोष साजरा करण्यात आला.
धाराशिव नगरपालिकेत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नेहा काकडे 3 हजार मताची विजयी
महाविकास आघाडीमध्ये फुटीचा भाजपला सरळ फायदा
उद्धव ठाकरे गट व शरद पवार गटाने स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला फायदा
धाराशिव नगरपालिकेसाठी खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती
महायुतीमध्ये मोठा भाऊ जरी भाजप असला तरी दुसऱ्या स्थानावर चक्क अजितदादा नाही तर शिंदे यांनी आपलं स्थान अढळ केलं आहे. अजितदादा जास्त जागा काढतील असं सगळ्यांना वाटत असताना शिंदेंनी मात्र बाजी मारली आहे.
भाजप – 120
शिवसेना – ५४
राष्ट्रवादी- ४०
या समीकरणाचा आता महानगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीला शिंदेंना फायदा मिळणार का हे पाहावं लागणार आहे. शिंदे गटानं जास्त जागा जिंकून दुसऱ्या स्थानावर बाजी मारली आहे.
काँग्रस 33, शरद पवार गट 07 ठाकरे गट 8 तर इतर 23 जागांवर विजयी झालं आहे. भाजपने 127 जागांवर विजय मिळवला आहे. तर अजित पवार यांच्या गटाने 37 तर शिंदे गटाने 53 ठिकाणी विजय मिळवला आहे.
अवघ्या 23 वर्षाच्या दुर्गादेवी जगदाळे नगराध्यक्षपदी निवड तर इंद्रजीत जगदाळे नगरसेवक पदी
दौंड नगर परिषदेचा निकाल लागला या निकालात बाप लेकीची चलती पाहायला मिळाली अवघ्या 23 वर्षाच्या दुर्गादेवी जगदाळे या नगराध्यक्षपदी निवड झाली तर त्यांचे वडील इंद्रजित जगदाळे हे नगरसेवक पदी विराजमान झाल्यात मुलगी नगराध्यक्ष पदी निवडून आल्याने बापाने आनंद व्यक्त केला
हिंगोली नगरपरिषद शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेखाताई श्रीराम बांगर यांची विजयी….
भूम नगरपरिषदेतला निकाल पालटला
198 मताने तानाजी सावंताचे उमेदवार संयोजिता गाढवे विजयी
या अगोदर 130 मताने थोरात सत्वशीला या विजयी झाल्याची झाली होती घोषणा
पुन्हा मोजणी केल्यानंतर संगीता गाढवे या विजयी
आमदार अशोकराव माने यांच्या मुलगा सुनेचा होमपीचवर दारुण पराभव
शिरोळातील मतदारांना भाजप ताराराणी आघाडीला नाकारले.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सारिका अरविंद माने पराभूत
तर नगरसेवक पदाच्या
अरविंद अशोकराव माने पराभूत



