2 तास 29 मिनिटांची ही नवी फिल्म, OTT वर रिलीज होताच करतेय ट्रेंड, Netflix वर नंबर 1
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Netflix Trending Movie : नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 2 तास 29 मिनिटांची एक फिल्म सध्या OTT वर धमाका करत आहे. सर्वत्र या फिल्मची चर्चा आहे.
Netflix वर मनोरंजनाची मोठी मेजवानी आहे. रोमान्स, सस्पेन्स, थ्रिलर, ड्रामा, अॅक्शन, अॅडव्हेंचर अशा वेगवेगळ्या जॉनरच्या फिल्म नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. पण नेटफ्लिक्सवर नुकतीच रिलीज झालेली 2 सात 29 मिनिटांची एक नवी फिल्म मात्र OTT वर धुमाकूळ घालत आहे. या फिल्मची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
advertisement
advertisement
नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत असलेल्या या फिल्मच्या कथेची सुरुवात बंसल हवेलीतील एका भयानक घटनेनंतर होते. जो गुन्हा एखाद्या धार्मिक विधीसारखा वाटतो, तो पुढे एक गुंतागुंतीच्या तपासात बदलतो. ज्यामध्ये कुटुंबातील गुपितं, श्रद्धा, सत्ता आणि भ्रष्टाचार यांचा समावेश असतो. हळूहळू पुढे सरकणारी ही कथा सविस्तर पोलिस तपास आणि भयावह क्राइम ड्रामा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी खास तयार करण्यात आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'रात अकेली है: द बंसल मर्डर्स' या सिनेमात दमदार कलाकारांची फौज आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत चित्रांगदा सिंग मीरा या भूमिकेत दिसते. तर राधिका आपटे ही राधा भूमिकेत दिसून येते. याशिवाय दिप्ती नवल, इला अरुण, रेवती आशा केलूनी, रजत कपूर, संजय कपूर, अखिलेंद्र मिश्रा, श्रीधर दुबे आणि प्रियांका सेतिया हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
'रात अकेली है: द बंसल मर्डर्स' या फिल्ममध्ये जबरदस्त मर्डर मिस्ट्री दाखवण्यात आली आहे. प्रत्येक फ्रेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना बांधून ठेवते. डोक्याला शॉट देणारी ही सीरिज आहे. स्मिता सिंह यांनी या फिल्मचं कथानक लिहिलं असून हनी त्रेहन यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या वीकेंडला ही मर्डर मिस्ट्री तुम्ही नक्की पाहू शकता.










