एक फोटो, एक रात्र अन् दोन लाखांचा रेट, हाय प्रोफाईल मॉडेलचा व्हायचा सौदा, मुंबईपासून गोव्यापर्यंतचं रॅकेट उघड

Last Updated:

मॉडेलिंग आणि प्रोफेशनल फोटोशूटच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

News18
News18
मॉडेलिंग आणि प्रोफेशनल फोटोशूटच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत वर्तक नगर पोलिसांनी एका महिला एजंटसह चक्क मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या एका वकिलाला अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ४ पीडित तरुणींची सुटका केली असून या घटनेने ठाण्यासह मुंबईत खळबळ उडाली आहे.

नेमकी कारवाई कशी झाली?

पोखरण रोड क्रमांक १ परिसरात मॉडेलिंगच्या नावाखाली वेश्याव्यवसायासाठी काही एजंट महिलांना घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती वर्तक नगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांचे फोटो ग्राहकांना पाठवून त्यांचे सौदे करायचे. ज्या ठिकाणी आरोपी महिलांना ग्राहकांकडे सोपवण्यासाठी आले होते, त्याच वेळी पोलिसांनी छापा टाकून एका पुरुष आणि एका महिला एजंटला ताब्यात घेतलं.
advertisement

उच्च न्यायालयाचा वकील निघाला रॅकेटचा मास्टरमाईंड

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेला पुरुष आरोपी हा मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारा वकील असल्याचं तपासात समोर आलं आहे. कायद्याचे रक्षण करणारा वकीलच गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी असल्यानं पोलीसही अवाक झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरोपी वकील ग्राहकांना मॉडेल्सचे फोटो पाठवायचा. ग्राहकांना मुलगी आवडली तर त्यांच्याकडून आरोपी एका रात्रीसाठी ७५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंतचा रेट सांगायचा. विशेष म्हणजे, हे रॅकेट केवळ ठाण्यापुरते मर्यादित नसून मुंबई, गोवा आणि इतर मोठ्या शहरांमधील नामांकित ३ आणि ५ स्टार हॉटेल्समध्ये महिलांना पुरवण्याचे काम हा वकील करत होता.
advertisement

४ महिलांची सुटका

पोलिसांनी या कारवाईत ४ पीडित महिलांना सुरक्षितपणे वाचवलं आहे. या महिलांना मॉडेलिंगच्या कामाचं आमिष दाखवून या दलदलीत ओढण्यात आलं होते का? याचा तपास आता पोलीस करत आहेत. वर्तक नगर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणे पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
एक फोटो, एक रात्र अन् दोन लाखांचा रेट, हाय प्रोफाईल मॉडेलचा व्हायचा सौदा, मुंबईपासून गोव्यापर्यंतचं रॅकेट उघड
Next Article
advertisement
Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या मतमोजणीस सुरुवात,  निकालाचा पहिला कल काय?
राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेची मतमोजणीस सुरू, निकालाचा पहिला क
  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

View All
advertisement