advertisement

Pune Crime: पुणे हादरलं! शरीरसंबंधांना नकार देताच तरुणाकडून महिलेची हत्या; मृतदेहाची अवस्था पाहून उडाली खळबळ

Last Updated:

हडपसर-सासवड रस्त्यालगत असलेल्या वडकी परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. या हत्येमागील संतापजनक कारण समोर आल्याने पुणे शहर हादरून गेले आहे.

तरुणाकडून महिलेची हत्या (प्रतिकात्मक फोटो)
तरुणाकडून महिलेची हत्या (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: हडपसर-सासवड रस्त्यालगत असलेल्या वडकी परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. या हत्येमागील संतापजनक कारण समोर आल्याने पुणे शहर हादरून गेले आहे. लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने एका नराधमाने महिलेचा निर्घृण खून केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
३ मार्च रोजी दिवे घाटाच्या पायथ्याशी, वडकी गावातील एका गोदामाशेजारील मोकळ्या जागेत ३० ते ४० वर्षे वयोगटातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेच्या युनिट सहाने तपास सुरू केला होता.
advertisement
सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी जाळ्यात
पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून छाननी केली. या तांत्रिक तपासातून प्रकाश बिभीषण माने (वय २९, रा. वडकी नाला) याची ओळख पटली आणि पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.
अत्याचाराला विरोध केल्याने घेतला जीव
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली दिली. महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा त्याचा प्रयत्न फसला, ज्यामुळे संतापलेल्या प्रकाशने तिचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत वेगाने तपास करत या क्रूर गुन्ह्याचा छडा लावला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुणे हादरलं! शरीरसंबंधांना नकार देताच तरुणाकडून महिलेची हत्या; मृतदेहाची अवस्था पाहून उडाली खळबळ
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement