नोटा मोजून मशीन गरम झालं, पण थप्पी संपली नाही, लेफ्टनंट कर्नलच्या घरातून सापडलं कोट्यवधींचं घबाड

Last Updated:
CBI ने लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांना ३ लाख लाच घेताना पकडलं, पत्नी कर्नल काजल बाली आणि दुबई कंपनीचा सहभाग, अनेक शहरांत छापे आणि मोठी रोकड जप्त.
1/6
नोटा मोजून मशीन गरम झालं मात्र नोटांची थप्पी काही मोजून संपली नाही, देशातील सर्वात मोठी धाड टाकण्यात आली तीही कोणी व्यवसायिक किंवा राजकारणी नाही तर चक्क भारतीय सैन्यदलातील अधिकाऱ्याच्या घरावर टाकण्यात आली. या प्रकरणात त्याच्यासोबत आणखी एक अधिकारी आणि पत्नीची चौकशी सुरू आहे. CBI च्या अधिकाऱ्यांनी जेव्हा ही धाड टाकली ते त्यांना जे सापडलं ते पाहून डोळेच विस्फारले.

advertisement
2/6
संरक्षण मंत्रालयात भ्रष्टाचाराची एक मोठी कीड समोर आली आहे. सीबीआयने एका धाडसी कारवाईत संरक्षण उत्पादन विभागात तैनात असलेले लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांना ३ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. या कारवाईने लष्करी आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात शर्मा यांच्या पत्नीसह एका आंतरराष्ट्रीय कंपनीचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे.

3/6
लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा हे संरक्षण मंत्रालयांतर्गत संरक्षण उत्पादन विभागात कार्यरत आहेत. खाजगी कंपन्यांना संरक्षण उत्पादनांची निर्मिती आणि निर्यातीसाठी नियमबाह्य मदत करणे आणि त्यांना सरकारकडून अनुचित लाभ मिळवून देणे, असा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा हे बेंगळुरू येथील एका कंपनीच्या प्रतिनिधींकडून नियमितपणे लाच स्वीकारत होते.

4/6
सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरनुसार या कटात केवळ दीपक कुमार शर्माच नाही, तर त्यांच्या पत्नी कर्नल काजल बाली आणि दुबईस्थित एका कंपनीचाही समावेश आहे. बेंगळुरूमध्ये राहणारे राजीव यादव आणि रवजित सिंह हे या कंपनीचे भारतीय कामकाज पाहतात. हे दोघेही सातत्याने शर्मा यांच्या संपर्कात होते.

5/6
१८ डिसेंबर रोजी कंपनीच्या सूचनेनुसार विनोद कुमार नावाच्या व्यक्तीने ३ लाख रुपयांची लाच लेफ्टनंट कर्नल शर्मा यांच्याकडे सोपवली आणि तिथेच सीबीआयने सापळा रचून ही कारवाई केली. या अटकेनंतर सीबीआयने दिल्ली, बेंगळुरू, जम्मू आणि श्रीगंगानगरसह अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. या छापेमारीत हाती लागलेली मालमत्ता थक्क करणारी आहे:
१८ डिसेंबर रोजी कंपनीच्या सूचनेनुसार विनोद कुमार नावाच्या व्यक्तीने ३ लाख रुपयांची लाच लेफ्टनंट कर्नल शर्मा यांच्याकडे सोपवली आणि तिथेच सीबीआयने सापळा रचून ही कारवाई केली. या अटकेनंतर सीबीआयने दिल्ली, बेंगळुरू, जम्मू आणि श्रीगंगानगरसह अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे. या छापेमारीत हाती लागलेली मालमत्ता थक्क करणारी आहे.
advertisement
6/6
दिल्ली निवासस्थानी ३ लाख रुपयांची रक्कम आणि अतिरिक्त २.२३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आली. दिल्लीतील शर्मा यांच्या कार्यालयातही अद्याप झडती सुरू असून, काही महत्त्वाची फाईल्स ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement