ED च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चौथा क्रिकेटर, 'वर्ल्ड कप हिरो' Yuvraj Singh ला सक्तवसुली संचालनालयाचं समन्स!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Online Betting Money Laundering Case : टीम इंडियाचा सुपरस्टार क्रिकेटर आणि वर्ल्ड कप हिरो युवराज सिंग याला ईडीने समन्स बजावलं आहे. ऑनलाईन बेटिंग अॅप प्रकरणात युवराजला नोटीस पाठवल्याची माहिती मिळतीये.
ED Summons To Yuvraj Singh : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचे खेळाडू ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाच्या रडारवर आहेत. सुरेश रैना आणि शिखर धवन यांना ईडीने नोटीस पाठवली होती अन् त्यांची चौकशी देखील करण्यात आली. त्यानंतर रॉबिन उथप्पा याला देखील चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. अशातच आता ईडीच्या रडारवर चौथा क्रिकेटर आला आहे. ईडीने टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटर आणि वर्ल्ड कप जिंकवून देणारा हिरो युवराज सिंग याला देखील ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय क्रिकेटपटूंना समन्स
युवराज सिंगला 23 सप्टेंबर रोजी दिल्लीतील ईडी मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. हा खटला ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे. आतापर्यंत दिल्लीत या प्रकरणात चार माजी भारतीय क्रिकेटपटूंना समन्स बजावण्यात आले आहे. युवराज किंवा उथप्पाने या बेटिंग अॅपच्या प्रमोशनमध्ये त्यांच्या चेहऱ्यांचा वापर केला आणि त्या बदल्यात काही पैसे घेतले का? याची ईडी चौकशी करत आहे.
advertisement
#Breaking | The ED has widened its money laundering probe, summoning Robin Uthappa on Sept 22, Yuvraj Singh on Sept 23 and Sonu Sood on Sept 24 to record statements under PMLA over alleged links through endorsements and payments.@_anshuls with details | @akankshaswarups #ED… pic.twitter.com/q2g0Q0zvU6
— News18 (@CNNnews18) September 16, 2025
advertisement
युवराज सिंगची क्रिकटमधली संपूर्ण कुंडली?
युवराज सिंग हा भारतीय क्रिकेटमधील एक महान अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. युवराज सिंगने 2000 मध्ये केनियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तर 2003 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो सुरुवातीपासूनच एक उत्कृष्ट फलंदाज आणि उपयुक्त डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला जाऊ लागला. टी20 विश्वचषक स्पर्धेत त्याने इंग्लंडविरुद्ध एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा ऐतिहासिक विक्रम केला. हा टी20 क्रिकेटमधील पहिलाच विक्रम होता. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे 30 बॉलमध्ये 70 रन महत्त्वपूर्ण ठरले, ज्यामुळे भारताने तो विश्वचषक जिंकला.
advertisement
2011 च्या वर्ल्ड कपचा हिरो
2011 एकदिवसीय विश्वचषक युवराज सिंगच्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. युवराजने या विश्वचषकात 362 रन आणि 15 विकेट्स घेऊन भारताला विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याच्या या ऑलराऊंडर कामगिरीबद्दल त्याला 'मॅन ऑफ द टूर्नामेंट'चा पुरस्कार मिळाला. 2011 च्या विश्वचषकादरम्यान त्याला कर्करोगाचे निदान झालं होतं, तरीही तो खेळत राहिला. यानंतर त्याने कर्करोगावर यशस्वी मात केली.
advertisement
मैदानात दमदार पुनरागमन
कर्करोग झाल्यानंतर देखील युवीने पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दमदार पुनरागमन केलं. त्याने आयपीएलमध्ये अनेक टीम्सकडून खेळला आहे. 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि 2019 मध्ये मुंबई इंडियन्स या दोन्ही टीम्सने आयपीएलचे विजेतेपद मिळवताना तो टीमचा भाग होता. 2017 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर त्याने 2019 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. युवराज सिंगला 2012 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 1:17 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ED च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चौथा क्रिकेटर, 'वर्ल्ड कप हिरो' Yuvraj Singh ला सक्तवसुली संचालनालयाचं समन्स!