Asia Cup जिंकल्यावरही सूर्या ट्रॉफी स्विकारणार नाही! कॅप्टनने ICC समोर काय ठेवली अट? पाकिस्तानची पुन्हा बदनामी

Last Updated:

Suryakumar yadav asia cup trophy refusal: टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव हा आशिया कप जिंकला तरी देखील ट्रॉफी घेणार नाही. यासाठी टीम इंडियाने एक अट देखील ठेवली आहे.

Team india will not received trophy
Team india will not received trophy
India vs Pakistan Asia Cup 2025 : भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा सलमान अली आगा यांनी हस्तांदोलन केलं नाही, तेव्हापासून आशिया कपमधील मोठा वाद सुरू झाला आहे. पीसीबीचा आरोप आहे की, मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी भारतीय संघाच्या दबावाखाली हस्तांदोलनाची सूचना दिली. पाकिस्तान क्रिकेट संघाचे व्यवस्थापक नवीद चीमा यांनी औपचारिकपणे एसीसीकडे तक्रार केली. अशातच आता टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव याने मोठा निर्णय (suryakumar yadav asia cup trophy refusal) घेतला आहे.

आशिया कप जिंकला तरी ट्रॉफी घेणार नाही

हँडशेक कॉन्ट्रोवर्सीनंतर टीम इंडिया आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव हा आशिया कप जिंकला तरी देखील ट्रॉफी घेणार नाही, जर ACC म्हणजेच एशियन क्रिकेट काऊंसिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी हे ट्रॉफी देणार असतील. मोहसिन नकवी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत.
advertisement

स्टेज शेअर करणार नाही

जर सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचला तर ते पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यासोबत स्टेज शेअर करणार नाही, असं निर्णय टीम इंडियाने घेतला आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे.

पायक्रॉफ्टला रेफरी पॅनेलमधून काढून टाकण्याची मागणी

advertisement
दरम्यान, पाकिस्तानच्या हँडशेक प्रकरणाच्या तक्रारीनंतर नवीद चीमा यांनी हे प्रकरण आयसीसीकडे नेले. त्यांनी पायक्रॉफ्टला रेफरी पॅनेलमधून काढून टाकण्याची मागणी केली आणि धमकी दिली की जर त्यांच्या अटी पूर्ण केल्या नाहीत तर पाकिस्तान आशिया कपमध्येच सोडेल.
advertisement
भारतीय संघ - अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, रिंकू सिंह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
पाकिस्तान संघ - सॅम अयूब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), फखर जमन, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन अफरीदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद, हुसैन तलत, हसन अली, खुशदिल शाह, हारिस राऊफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, सलमान मिर्झा.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup जिंकल्यावरही सूर्या ट्रॉफी स्विकारणार नाही! कॅप्टनने ICC समोर काय ठेवली अट? पाकिस्तानची पुन्हा बदनामी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement