Bruise : काळ्या निळ्या डागावर हा उपाय नक्की करा, वेदना होईल कमी, डागही होईल नाहिसा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
एखाद्या गोष्टीवर आदळल्यामुळे किंवा पडल्यामुळे त्वचेखाली रक्ताच्या गुठळ्या होतात. त्यामुळेच त्या ठिकाणी निळा किंवा जांभळा डाग दिसून येतो. हे डाग, वेदना कमी करण्यासाठी गरम पाण्याचा शेक किंवा आईस बॅग वापरणं हे चांगले पर्याय आहेत.
मुंबई : कधीकधी नकळतपणे अंगावर जखम होते, कधी मुका मार लागतो. जिथे लागलंय तो भाग काळा निळा होतो. किरकोळ दुखापत झाल्यानंतर किंवा एखाद्या गोष्टीवर आदळल्यानंतर जखम होते. तसंच एखाद्या गोष्टीवर आदळल्यामुळे किंवा पडल्यामुळे त्वचेखाली रक्ताच्या गुठळ्या होतात. त्यामुळेच त्या ठिकाणी निळा किंवा जांभळा डाग दिसून येतो.
सहसा या खुणा काही दिवसांत नाहीशा होतात. पण काही वेळा, ही खूण एका आठवड्यानंतरही जात नाही आणि कधीकधी वेदना आणि सूज देखील वाढते.
advertisement
Skin Care : चेहऱ्यावर मध लावावा का ? मध चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे का ? वाचा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला
आहारतज्ज्ञांच्या मते, दुखापत झाल्यानंतर लगेचच जखम झालेल्या भागावर बर्फाचा पॅक म्हणजेच आईस पॅक लावं खूप फायदेशीर आहे. बर्फाचे पॅक लावल्यानं रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते आणि सूज कमी होते.
पहिले 48 तास, त्या भागावर दहा ते पंधरा मिनिटं दिवसातून तीन ते चार वेळा कोल्ड कॉम्प्रेस म्हणजेच आईस पॅक लावा. पण बर्फ थेट त्वचेवर लागणार नाही याची काळजी घ्या. आईस पॅक प्रथम स्वच्छ कापडात गुंडाळा आणि नंतर ते त्वचेवर लावा.
advertisement
जखम झाल्यानंतर दोन दिवसांच्या अंतरानं कोमट स्पंज किंवा हॉट वॉटर बॅगमधे खूप गरम नाही पण कोमट पाणी टाकून वापरा. यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते आणि रक्ताची गुठळी हळूहळू विरघळू लागते. यामुळे जखम लवकर हलकी होते आणि वेदना देखील कमी होतात.
advertisement
मालिश टाळा - तज्ज्ञांच्या मते, दुखापत झालेल्या भागावर थेट दाब देऊन किंवा दाबून मालिश करणं योग्य नाही. यामुळे दुखापत आणखी वाढू शकते किंवा सूज येऊ शकते. त्यामुळे त्या भागाचं मालिश करणं टाळा, फक्त हलक्या हातांनी गरम तेल लावत राहा. यामुळे दोन दिवसांत त्वचेवरील डाग पूर्णपणे निघून जाईल आणि तुम्हाला कोणताही त्रासही जाणवणार नाही.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 2:19 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bruise : काळ्या निळ्या डागावर हा उपाय नक्की करा, वेदना होईल कमी, डागही होईल नाहिसा