advertisement

Marathi Actress : मराठी TV ची एकेकाळची आघाडीची नायिका, मग झाली खलनायिका; आता थेट साकारणार आईची भूमिका

Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कधीकाळी नायिका म्हणून दिसणारी ही अभिनेत्री आता थेट आईच्या भूमिकेत दिसणार आहे.
1/8
टेलिव्हिजन विश्वात अनेक अभिनेत्री आहेत ज्या आधी मालिकेच्या नायिका होत्या. एकेकाळी टेलिव्हिजन गाजवणाऱ्या या नायिका पुढे मालिकेत खलनायिकेचीही भूमिका करू लागल्या.
टेलिव्हिजन विश्वात अनेक अभिनेत्री आहेत ज्या आधी मालिकेच्या नायिका होत्या. एकेकाळी टेलिव्हिजन गाजवणाऱ्या या नायिका पुढे मालिकेत खलनायिकेचीही भूमिका करू लागल्या.
advertisement
2/8
अशीच एक अभिनेत्री जी आता थेट आईच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीला पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
अशीच एक अभिनेत्री जी आता थेट आईच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीला पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
advertisement
3/8
झी मराठीवर सनई चौघडे ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत मेघना ऐरडे, सुहास शिरसाट, राज हंसनाळे सारखी जबरदस्त स्टारकास्ट आहे. मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीचं नाव समोर आली. ही अभिनेत्री म्हणजेच अदिती सारंगधर. मालिकेत ती तेजस्विनी खानोलकर ही भूमिका साकारणार आहे. 

4/8
या भूमिकेबद्दल बोलताना अदिती म्हणाली,
या भूमिकेबद्दल बोलताना अदिती म्हणाली, "तेजस्विनी खानोलकर, नाव जस भारदस्त आहे तशीच माझी व्यक्तीरेखा आहे. माझ्या सुदैवाने मला नेहमीच छान भारदस्त भूमिका मिळालेल्या आहेत. तेजस्विनीच्या मनात बरेच वर्षांपासून अनेक गोष्टी आहेत. तिने खूप सहन केलेल आहे खूप काही भोगलेल आहे, अनुभवलेलं आहे. बऱ्याच गोष्टीने तिच्या मनावर परिणाम केलेला आहे. दिसायला जे जस दिसत ते तस मुळात नसत, तशीच माझी व्यक्तीरेखा आहे. ती आपल्या कुटुंबासाठी जीव ओवाळून टाकणारी आहे, आपल्या मुलांवर अत्यंत प्रेम करणारी आहे."
advertisement
5/8
 "झी मराठी वर मी नायिकेची, खलनायिकेची भूमिका केली आहे पण आता पहिल्यांदा आता आईची भूमिका करणार आहे. मला झी मराठीने नेहमीच अशा सशक्त व्यक्तीरेखा दिलेल्या आहेत.  बऱ्याच नाटकांचं वाचन चालू आहे, मी आता स्वतः आई असल्यामुळे मला सशक्त भूमिका हवी होती. तेजस्विनीची भूमिका अगदी तशीच आहे, जिचं स्वतःच काही म्हणणं आहे, तिच्या भोवती बऱ्याच गोष्टी फिरत आहेत."

6/8
अदिती पुढे म्हणाली,
अदिती पुढे म्हणाली, "खर सांगायचं तर आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती. पण काही गोष्टी तुम्ही स्वीकारता, हल्ली टेलिव्हिजन मध्येही चांगले बदल घडून येत आहेत. म्ह्णून मी ह्या सगळ्याचा खोलवर विचार करून माझ्या तत्वांचा सांभाळ करत हि भूमिका स्वीकारली."
advertisement
7/8
आपल्या आतापर्यंतच्या कामाबद्दलही अदितीने सांगितलं. ती म्हणाली,
आपल्या आतापर्यंतच्या कामाबद्दलही अदितीने सांगितलं. ती म्हणाली, "आधीच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका कशी वेगळी आहे हे सांगायचे झाले तर 'वादळवाट' मधली रमा चौधरी, 'लक्ष' मधली सलोनी देशमुख 'हम बने तुम बने' मधली तुलीका 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधली मालविका, आणि आता 'सनई चौघडे' मधली तेजस्विनी प्रत्येक भूमिकेचे काहीतरी कंगोरे असतात प्रत्येक भूमिकेची काहीतरी खास वेगळेपण असतं, दिसण्यामध्ये वागण्यामध्ये वावरण्यामध्ये."
advertisement
8/8
सनई चौघडे या मालिकेतून तेजस्विनी खानोलकरच्या रूपात अदिती सारंगधर पुन्हा प्रेक्षकांसमोर येत आहे. 16 मार्च पासून रात्री 8.30 वाजता ही मालिका टेलिकास्ट होणार आहे. 
सनई चौघडे या मालिकेतून तेजस्विनी खानोलकरच्या रूपात अदिती सारंगधर पुन्हा प्रेक्षकांसमोर येत आहे. 16 मार्च पासून रात्री 8.30 वाजता ही मालिका टेलिकास्ट होणार आहे.
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement