तासाभराचा प्रवास मिनिटांवर! नव्या मार्गिकेमुळे पनवेलकरांची ट्रॅफिकमधून कायमची सुटका; नेमका प्लॅन कसा?
Last Updated:
Panvel City News : पनवेल शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता शहरातील नागरिकांना यापुढे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावण्याची शक्यता अधिक कमी होणार आहे. नेमका कोणता प्रकल्प या शहरात होणार आहे.
पनवेल : गेल्या काही वर्षांत नवी मुंबई तसेच रायगड या भागाचा विकास झपाट्याने होत आहे. त्यातही अनेक औद्योगिक भाग आणि वाढती लोकसंख्या यांमुळे पनवेल शहर महत्त्वाचे शहर बनत आहे आणि या शहरात सुरु होत असलेल्या मेट्रो मार्गिकेमुळे शहराचा अजून विकास होत आहे. नेमकी ही मार्गिका कोणती आहे आणि नेमका कोणत्या भागाला चालना मिळत आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
नवी मुंबई शहरातही मेट्रो मार्गिकेचे जाळे वेगाने पसरत असून तळोजा-खांदेश्वर ही मेट्रो मार्गिका सुरु झाल्यानंतर रेल्वे, मेट्रो आणि मुख्य म्हणजे विमानतळ एकत्र जोडले जाणार आहे. त्यामुळे पनवेल शहर हे महत्त्वाचे ट्रान्झिट आणि लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'या' मेट्रो मार्गिकेचे वैशिष्टे काय?
1) तळोजा-खांदेश्वर ही मेट्रो मार्गिका भविष्यात पनवेल शहराच्या विकासासाठी मुख्य मानली जात आहे.
advertisement
2) ज्यात साधारण 10.30 किमी लांबीचा हा मेट्रो मार्ग असणार असून त्यासाठी सुमारे 575 कोटी रुपयांचा खर्च येणं अपेक्षित आहे.
3) तळोजा-खांदेश्वर या मेट्रो मार्गिकेमध्ये तब्बल आठ मेट्रो स्थानकही उभारली जाणार आहेत, त्यामुळे तळोजा, कामोठे तसेच पनवेल भागातील हजारो नागरिकांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे.
प्रवास होणार वेगवान
पनवेल परिसरातही दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे. त्यात कळंबोली, कामोठे आणि तळोजा या भागांमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर अनेक नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडतील. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होऊन वाहतुकीवरील ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 2:49 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
तासाभराचा प्रवास मिनिटांवर! नव्या मार्गिकेमुळे पनवेलकरांची ट्रॅफिकमधून कायमची सुटका; नेमका प्लॅन कसा?








