advertisement

सूनेनं छळलं, सासऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, बार्शीत भयंकर घडलं, सारं गाव हळहळलं

Last Updated:

Solapur News: गेल्या काही महिन्यांपासून सासरे सर्जेराव हे त्यांच्याकडे राहत होते. तेव्हा सून सारिका ही किरकोळ कारणावरून सतत अपमानित करून मानसिक त्रास देत होती.

Solapur News: सूनेकडून छळ, सासऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, बार्शीत भयंकर घडलं, सारं गाव हळहळलं
Solapur News: सूनेकडून छळ, सासऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, बार्शीत भयंकर घडलं, सारं गाव हळहळलं
सोलापूर: सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली आहे. सर्जेराव शंकरराव नायकुडे असे 73 वर्षीय सासऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे त्यांनी आत्महत्या केली. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
सर्जेराव नायकुडे यांचा मुलगा महेश नायकुडे (वय 41) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाऊ उमेश याची पत्नी सारिका उमेश नायकुडे (रा. कुर्डुवाडी रोड, बार्शी) हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सर्जेराव नायकुडे आणि फिर्यादी मुलगा महेश हे बार्शीतील नाईकवाडी प्लॉट येथील स्वतःच्या बंगल्यात राहत होते. तर फिर्यादी महेश नायकुडे याचा भाऊ उमेश व त्याची पत्नी सारिका हे काही महिन्यांपासून कुर्डुवाडी रोड परिसरात राहत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून सासरे सर्जेराव हे त्यांच्याकडे राहत होते. तेव्हा सून सारिका ही किरकोळ कारणावरून सतत अपमानित करून मानसिक त्रास देत होती. त्यामुळे सर्जेराव नायकुडे हे मानसिक तणावात होते. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून ते नाईकवाडी प्लॉट बार्शी येथे आले आणि 10 मार्च रोजी टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी विषारी द्रव्य पिऊन जीवन संपवले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
सूनेनं छळलं, सासऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, बार्शीत भयंकर घडलं, सारं गाव हळहळलं
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement