Gold Jewelry Astrology: सोन्याची अंगठी चुकीच्या बोटात धारण करून उपयोग नाही; प्रगतीला शिडी लागण्यासाठी..

Last Updated:
Gold Jewelry Astrology: सोनं या धातूला खूप विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच त्याच्या किमती सध्या कुठे पोहचल्या आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सोनं फक्त एक रत्न नसून ते आपल्या जीवनात आनंद आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. बहुतांश लोक सोनं केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी घालतात, परंतु ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, सोने घालण्याची योग्य पद्धत महत्त्वाची मानली जाते. यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि यश मिळू शकते. शक्यतो उजव्या हाताच्या बोटांवर सोनं धारण केल्यानं नशीब बदलू शकतं, कोणत्या बोटात सोन्याची अंगठी घालणं अधिक फायदेशीर असेल? त्यानं तुमच्या आयुष्यातील समस्या कमी होतीलच पण तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील सुधारेल. ज्योतिषी अंशुल त्रिपाठी यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1/5
1. गळ्यात सोनं घालणं - गळ्यात सोन्याची साखळी-चेन घालल्याने सौंदर्य तर वाढतंच, शिवाय वैवाहिक जीवनात संतुलन आणि आनंदही येतो. बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे नात्यांमध्ये वाद निर्माण होतात, परंतु गळ्यात सोने घालल्यानं नात्यांमध्ये गोडवा आणि समजूतदारपणा वाढतो. तसेच, हृदयरोग्यांसाठी ते फायदेशीर मानले जाते.

advertisement
2/5
2. अनामिका बोटात सोनं - अनामिका बोटात सोनं धारण केल्यानं संतती सुखाची शक्यता वाढते. या बोटातील सोनं तुमच्या भविष्यातील आणि कुटुंबाच्या सुखाशी संबंधित आहे. तुम्ही संतती सुखाची कामना करत असाल तर अनामिका बोटात सोन्याची अंगठी घालणे फायदेशीर ठरेल.

3/5
3. रुद्राक्षात सोनं - जर तुम्ही रुद्राक्षासह सोने धारण केले तर ते हृदयरोग्यांसाठी विशेषतः फायदेशीर आहे. हृदयाच्या कमकुवतपणा किंवा इतर संबंधित समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी हा उपाय सोपा आणि प्रभावी मानला जातो.

4/5
4. तर्जनी बोटात सोनं - करिअर आणि नोकरीत यश मिळविण्यासाठी तर्जनी बोटात सोन्याची अंगठी घालणे फायदेशीर आहे. हे बोट तुमच्या महत्वाकांक्षा आणि व्यावसायिक निर्णयांना सकारात्मक ऊर्जा देते, जर तुम्ही नवीन नोकरी किंवा पदोन्नतीसाठी प्रयत्न करत असाल तर हा उपाय उपयुक्त ठरू शकतो.

5/5
5. करंगळीत सोनं - करंगळीत सोनं धारण केल्यानं विविध आजार आणि मानसिक अस्वस्थतेपासून दिलासा मिळतो. हे बोट तुमच्या मानसिक संतुलन आणि आरोग्याशी जोडलेली आहे. तणाव किंवा झोपेच्या तक्रारी असलेल्या लोकांनी सोनं धारण करून चांगला अनुभव घेऊ शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
5. करंगळीत सोनं - करंगळीत सोनं धारण केल्यानं विविध आजार आणि मानसिक अस्वस्थतेपासून दिलासा मिळतो. हे बोट तुमच्या मानसिक संतुलन आणि आरोग्याशी जोडलेली आहे. तणाव किंवा झोपेच्या तक्रारी असलेल्या लोकांनी सोनं धारण करून चांगला अनुभव घेऊ शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement