'मुळशी पॅटर्न' फेम पिट्याभाईला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले, "छाती ठोकपणे सांगत होता, मी..."

Last Updated:

‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटातील 'पिट्याभाई' ही भूमिका गाजवणारे अभिनेते प्रवीण परदेशी यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भर कार्यकर्त्यांसमोर सुनावलं आहे.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटातील 'पिट्याभाई' ही भूमिका गाजवणारे अभिनेते प्रवीण परदेशी यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भर कार्यकर्त्यांसमोर सुनावलं आहे. परदेशी यांनी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) निष्ठावान कार्यकर्ते असल्याचे वारंवार सांगितलं होतं. यासंदर्भातील काही फोटो राज ठाकरेंच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी ही कानउघाडणी केल्याची माहिती आहे.
अभिनेते प्रवीण परदेशी हे मनसेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आहेत. मनसेच्या एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण परदेशी यांनी 'मी संघाचा कार्यकर्ता आहे' असे छाती ठोकपणे सांगितलं होतं. इतकेच नव्हे तर, त्यांचे आणि संघाच्या कार्यकर्त्यांचे काही फोटो देखील राज ठाकरेंपर्यंत पोहोचले होते.
या प्रकारानंतर राज ठाकरे यांनी प्रवीण परदेशी यांना स्पष्ट शब्दात खडसावले. "तू एकाच ठिकाणी कुठे तरी राहा! कशाला टाईमपास करतोस?" असा रोखठोक सल्ला राज ठाकरे यांनी परदेशी यांना दिला. मनसेचे पदाधिकारी असूनही दुसऱ्या संघटनेशी असलेली निष्ठा जाहीरपणे बोलून दाखवणे आणि संबंधित फोटो व्हायरल करणे, ही बाब राज ठाकरेंना खटकली. यामुळे त्यांनी प्रवीण परदेशींना सुनावल्याची माहिती आहे.
advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसेनं पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. राज ठाकरे विविध ठिकाणी सभा आणि बैठका घेत आहेत. नुकतीच त्यांनी मनसेच्या चित्रपट सेनेची बैठक घेतली. या बैठकीत राज ठाकरेंनी पिट्ट्याभाईला झापलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मुळशी पॅटर्न' फेम पिट्याभाईला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले, "छाती ठोकपणे सांगत होता, मी..."
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement