Post Office Scheme: फक्त 200 रुपये गुंतवा अन् 1 लाख मिळवा, काय आहे पोस्ट ऑफिसची स्कीम?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Post Office RD scheme: पोस्ट ऑफिस रेकरिंग डिपॉझिट स्कीममध्ये फक्त १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते, सुरक्षित बचत, चक्रवाढ व्याज, कर्ज सुविधा आणि लाखोंचा निधी तयार करण्याची संधी मिळते.
आपल्याला लहानपणी घरात शिकवलं जातं की एक दोन रुपयांपासून पैसे सेविंग करायला, तुमचा पगार कमी असेल तुम्हाला खूप जास्त पैसे साठवणं शक्य नसेल तर ही पोस्टाची स्कीम खास तुमच्यासाठी आहे. यामध्ये अगदी कमी रक्कम गुंतवून तुम्ही जास्त नफा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसची ही 'सुपरहिट' योजना आहे, जी तुम्हाला अगदी लहान गुंतवणुकीतून चांगले रिटर्न्स देऊ देते.
advertisement
advertisement
विशेष म्हणजे, तुम्ही फक्त १०० रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीपासून सुरुवात करून भविष्यासाठी लाखोंचा मोठा निधी तयार करू शकता. पैसे बुडण्याची कोणतीही भीती या योजनेत नाही, त्यामुळे कुणीही या योजनेत गुंतवणूक करु शकता. पोस्ट ऑफिसची ही 'स्मॉल सेव्हिंग स्कीम' सामान्य लोकांसाठी गुंतवणुकीचा एक सर्वोत्तम पर्याय आहे. ही रेकरिंग डिपॉझिट योजना लोकांमध्ये सर्वाधिक पसंतीची आहे.
advertisement
केवळ १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता आणि तुम्हाला हवी तेवढी रक्कम दर महिन्याला जमा करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही जास्तीत जास्त मर्यादा निश्चित केलेली नाही. या योजनेत तुम्ही १ वर्ष, २ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी पैसे गुंतवू शकता. पोस्ट ऑफिस दर तीन महिन्यांनी या योजनेवर व्याज देते, ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य सतत वाढत राहते आणि चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो.
advertisement
advertisement
या योजनेचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, जर तुम्हाला पैशांची तातडीची गरज भासली, तर तुम्ही तुमच्या जमा रकमेच्या आधारावर कर्ज देखील घेऊ शकता. आवश्यकता वाटल्यास, तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेशी संपर्क साधून या खात्यावर कर्ज मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या एकूण जमा केलेल्या रकमेच्या ५० टक्क्यांपर्यंत कर्ज घेण्याची सुविधा मिळते.
advertisement
advertisement
जर तुम्ही या पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये दररोज २०० रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला, तर तुमचा महिन्याचा एकूण मासिक हप्ता ६,००० रुपये होईल. समजा तुम्ही दोन वर्षांसाठी दररोज २०० रुपये गुंतवले, तर सध्याच्या ६.७ टक्के व्याजदरासह तुम्हाला दोन वर्षांत एक लाख ४४ हजार रुपये मिळतील, अंदाजे रिटर्न १० हजार रुपयांच्या आसपास राहतील तर दोन वर्षांनंतर १ लाख ५४ हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत.


