KGF च्या 'कासिम चाचा'चं निधन, घेत होते 3 लाखांचं इंजेक्शन, नेमकं काय झालं होतं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
KGF सिनेमातील कासिम चाचा भूमिका साकारणाऱ्या जेष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. तीन वर्ष त्यांच्या उपचार सुरू होते. त्यांना नेमकं काय झालं होतं?
मनोरंजन विश्वातील मागील काही दिवसांत अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच न भरून निघणारी आहे. दरम्यान आता मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का बसला आहे. KGF या प्रसिद्ध सिनेमातील अभिनेत्याचं निधन झालं आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
KGF सिनेमात रॉकीच्या काकांचा म्हणजेच कासिम चाचाची भूमिका साकारणे प्रसिद्ध अभिनेते हरीश राय यांचं निधन झालं आहे. KGF मुळे त्यांनी खूप प्रसिद्धी मिळाली. KGF 2 च्या शूटींगवेळीच अभिनेते हरिश यांची प्रकृती ढासळली होती. हरिश यांनी बंगळुरूच्या किदवई रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
advertisement
मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, अभिनेते हरिश यांना घशाचा कॅन्सर झाला होता. त्यांचा कॅन्सर पोटापर्यंत पसरला होता. ते खूप कमाजोर झाले होते. त्यांचं वजन प्रचंड कमी झालं होतं. इतकंच नाही तर त्यांच्या पोटात पाणी झाल्याने पोट खूप वाढलं होतं. KGF 2 च्या शूटींगवेळी त्यांच्यावर उपचार सुरू होते. कॅन्सरमुळे गळ्याला आलेली सूज दिसू नये यासाठी त्यांनी दाढी वाढवली होती.
advertisement
अभिनेते हरिश राय यांच्यावर अनेक दिवस कॅन्सरचे उपचार सुरू होते. ते लवकरच बरे होतील असं वाटत होतं. कॅन्सर झाल्यानंतर त्यांनी सिनेमातून ब्रेक घेतला होता. KGF 2 मधून त्यांनी कमबॅक केलं होतं. पण त्यानंतर कॅन्सरने त्यांना पुन्हा घेरलं आणि ते सिनेमापासून पुन्हा दूर झाले.
हरिश यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी माझी पहिली सर्जरी करणं काढलं. फिल्मी रिलीज होईपर्यंत वाट पाहिली. मी कॅन्सरच्या चौथ्या स्टेजला होतो त्यामुळे परिस्थिती खूप खराब होती. मी आर्थिक मदतीसाठी इंडस्ट्रीतील लोक आणि मित्रांना आवाहन केलं होतं."
advertisement
त्यांनी पुढे सांगितलं होतं की, त्यांच्या एका इंजेक्शनची किंमत 3.55 लाख रुपये होती. डॉक्टरांनी 63 दिवसांच्या सायकलमध्ये 3 इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 1:57 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
KGF च्या 'कासिम चाचा'चं निधन, घेत होते 3 लाखांचं इंजेक्शन, नेमकं काय झालं होतं?


