IND vs AUS : 'हीच Playing XI परफेक्ट', सूर्याने ठणकावून सांगितलं, गंभीरच्या दोन्ही फेवरेटना टीमबाहेर काढलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 वनडे मॅचची सीरिज आणि पहिल्या दोन टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवरून मोठा वाद निर्माण झाला होता, ज्यावरून प्रशिक्षक गौतम गंभीरला निशाणा बनवलं गेलं.
क्वीन्सलँड : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 वनडे मॅचची सीरिज आणि पहिल्या दोन टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवरून मोठा वाद निर्माण झाला होता, ज्यावरून प्रशिक्षक गौतम गंभीरला सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा बनवलं गेलं. गंभीर स्वत:च्या लाडक्या खेळाडूंना संधी देत असल्याची टीका चाहत्यांनी केली, पण तिसऱ्या टी-20 मध्ये टीममध्ये बदल केले गेले आणि भारताचा विजय झाला. या विजयानंतर आमच्यासाठी हेच कॉम्बिनेशन योग्य असल्याचं कॅप्टन सूर्यकुमार यादव म्हणाला.
तिसऱ्या टी-20 सामन्यात अर्शदीप सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांना संधी मिळाली, आणि या दोघांनीच भारताला मॅच जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली, त्यामुळे अर्शदीप आणि सुंदरला डावलल्यावरून गंभीर चाहत्यांच्या टार्गेटवर आला.
आता चौथ्या टी-20 सामन्यातही भारताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. फास्ट बॉलर हर्षित राणाला पुन्हा एकदा बेंचवर बसावं लागलं आहे, तर नितीश कुमार रेड्डीही फिट झाला आहे, पण त्यालाही संधी देण्यात आलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचआधी नितीश कुमार रेड्डीला दुखापत झाली होती, त्यामुळे तो पहिल्या तीन सामन्यांमधून बाहेर झाला होता, पण चौथ्या मॅचच्या एक दिवस आधीच रेड्डी फिट झाल्याचं टीम मॅनेजमेंटकडून सांगितलं गेलं.
advertisement
टी-20 फॉरमॅटमध्ये जास्त ऑलराऊंडर खेळवण्यावर प्रशिक्षक गौतम गंभीरचा भर असतो, त्यामुळे शिवम दुबेसह, नितीश रेड्डीलाही संधी द्यायचा गंभीरचा आग्रह असतो. याशिवाय नितीश राणा आठव्या-नवव्या क्रमांकावर चांगली बॅटिंग करू शकतो, त्यामुळे त्यालाही संधी दिली जाते. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात गंभीरला नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणाला बाहेर ठेवावं लागलं आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन
advertisement
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 1:50 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : 'हीच Playing XI परफेक्ट', सूर्याने ठणकावून सांगितलं, गंभीरच्या दोन्ही फेवरेटना टीमबाहेर काढलं!


