Twinkle Khanna : अफेअरबाबत ट्विंकल खन्नाचं बोल्ड स्टेटमेन्ट, म्हणाली, "तरुणांपेक्षा म्हातारेच जास्त..."
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Twinkle Khanna : 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' शोमध्ये ट्विंकल खन्ना, काजोल, फराह खान, अनन्या पांडे यांनी रिलेशनशिप्स आणि अफेअर्सवर चर्चा केली. दरम्यान ट्विंकल खन्ना जे काही बोलली त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि काजोल सध्या त्यांच्या "टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" या शोमुळे चर्चेत आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये एक नवीन सेलिब्रेटी गेस्ट म्हणून येतो. त्यांच्याबरोबर प्रश्नोत्तराच्या सेगमेन्टमध्ये धम्माल घडते. लेटेस्ट एपिसोडमध्ये फराह खान आणि अनन्या पांडे यांनी हजेरी लावली. त्या अनेकदा विनोदी पद्धतीने सामाजिक विषयांवर चर्चा करतात. यावेळी त्यांनी रिलेशनशिप्स आणि अफेअरवर चर्चा केली. त्या जे काही बोलल्या त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
या एपिसोडमध्ये ट्विंकल खन्नाने अफेअर्सवर जोरदार टीका केली. 'अग्रिम-अग्रिम' सेगमेंट दरम्यान ट्विंकल आणि काजोलने "वयस्कर लोक त्यांचे अफेअर्स लहान लोकांपेक्षा चांगले लपवतात का?" असा प्रश्न विचारला. यावर ट्विंकल खन्ना लगेच सहमत झाली. तिने खिल्ली उडवली, "मोठे लोक यात पारंगत असतात, त्यांची खूप प्रॅक्टिस झालेली असते. फराह खान आणि अनन्या पांडे देखील तिच्या या मताशी सहमत झाली.
advertisement
दरम्यान काजोल ट्विंकलच्या या मताशी असहमत होती. काजोलने तिचे मत व्यक्त करताना म्हटले, "मला वाटतं की तरुण लोक त्यांच्या आयुष्यातील सर्वकाही लपवण्यात अधिक पटाईत असतात अगदी अफेअर्स देखील." अनन्या पांडेने उत्तर दिले की, "सोशल मीडियामुळे सर्वकाही बाहेर येतं." यावर फराह खान म्हणाली, "तरुण लोक प्रेमात नसतानाही पोस्ट करतात."
advertisement
शोमध्ये पुढे "आजची मुले कपडे बदलण्यापेक्षा लवकर पार्टनर बदलतात" असा प्रश्न विचारण्यात आला. त्यानर ट्विंकलने पुन्हा यावर सहमती दर्शवली. तर इतर तिघांनीही असहमती दाखवली. ट्विंकल म्हणाली, "आमच्या काळात असे होते की, 'लोक काय म्हणतील? आपण हे करू शकत नाही.' ते (तरुण लोक) वारंवार जोडीदार बदलत आहेत आणि मला वाटते की ही चांगली गोष्ट आहे."
advertisement
अनन्या पांडेने तिचे मत व्यक्त करताना म्हटले की, "हे फक्त आजच्या पिढीला लागू होत नाही. लोक नेहमीच जोडीदार बदलत असतात. पूर्वी गोष्टी शांतपणे घडायच्या." यावर ट्विंकल पुढे म्हणाली, "आता त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीचा भार पडत नाही. त्यांना फक्त वाटतं... जर ते काम करत नसेल तर पुढे जा."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 1:33 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Twinkle Khanna : अफेअरबाबत ट्विंकल खन्नाचं बोल्ड स्टेटमेन्ट, म्हणाली, "तरुणांपेक्षा म्हातारेच जास्त..."


