'यावेळी खरंच भीती वाटतेय', दीपिका कक्करच्या कॅन्सर ट्रीटमेंटवर शोएब इब्राहिमने दिले अपडेट, अभिनेत्रीच्या मनात भीती
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Deepika Kakkar liver cancer : सध्या दीपिका कक्कर स्टेज-२ लिव्हर कॅन्सरशी लढा देत आहे आणि तिच्या उपचाराबद्दल शोएबने नुकतेच मोठे अपडेट दिले आहे.
मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे त्यांच्या चाहत्यांसोबत आयुष्यातील प्रत्येक सुख-दुःखाचे क्षण शेअर करतात. सध्या दीपिका कक्कर स्टेज-२ लिव्हर कॅन्सरशी लढा देत आहे आणि तिच्या उपचाराबद्दल शोएबने नुकतेच मोठे अपडेट दिले आहे. लेटेस्ट ब्लड रिपोर्ट्सची वाट पाहताना, शोएब आणि दीपिका दोघांच्याही मनात असलेली चिंता आणि भीती स्पष्टपणे दिसत होती.
शोएब इब्राहिमने त्यांच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये दीपिकाच्या तब्येतीची माहिती दिली. तो म्हणाले की, त्यांना नियमित तपासणीसाठी वारंवार हॉस्पिटलमध्ये जावे लागते. शोएब म्हणाला, "कालच आम्ही ब्लड सॅम्पल देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. आता रिपोर्ट्स येतील."
यावेळी आपली चिंता व्यक्त करताना शोएब भावूक झाला. तो म्हणाला, "हा काळ आम्हाला नेहमी घाबरवतो. मला आशा आहे की अल्लाहच्या कृपेने सर्वकाही ठीक होईल." शोएबच्या या म्हणण्यावर दीपिकानेही होकारार्थी मान हलवली, तिच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती.
advertisement
कॅन्सर आणि कमजोर इम्युनिटी
काही महिन्यांपूर्वी दीपिका कक्करने स्टेज-२ लिव्हर कॅन्सरशी लढत असल्याचे उघड केले होते, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. जून महिन्यात तिने ट्यूमर काढण्याची शस्त्रक्रिया देखील करून घेतली होती. दीपिकाने तिच्या व्लॉगमध्ये सविस्तर सांगितले की, कॅन्सरचे उपचार सुरू असल्यामुळे तिची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी झाली आहे. यामुळे लहान संसर्गाशी लढणे देखील तिला कठीण झाले आहे.
advertisement
दीपिकाकडून मुलाला संसर्ग
दीपिकाने सांगितले की, तिचा दोन वर्षांचा मुलगा रुहान याच्याकडून तिला संसर्ग झाला आणि तिच्या सुरू असलेल्या उपचारामुळे हा संसर्ग अधिक गंभीर झाला. दीपिका म्हणाली, "रुहानकडून मला इन्फेक्शन झालं आणि माझ्या केसमध्ये इन्फेक्शन थोडं जास्त गंभीर झालं, कारण माझे उपचार सुरू आहेत." यामुळे डॉक्टरांनी तिला हेव्ही डोसच्या अँटिबायोटिक्स आणि अँटी-एलर्जिक औषधे सुरू केली आहेत. हे औषधोपचार तिच्या शरीरासाठी खूप हेवी ठरत आहेत. मात्र, तरीही शोएबच्या पाठिंब्याने आणि चाहत्यांच्या प्रेमाने ती या संकटावर मात करण्यासाठी तयार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 05, 2025 10:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'यावेळी खरंच भीती वाटतेय', दीपिका कक्करच्या कॅन्सर ट्रीटमेंटवर शोएब इब्राहिमने दिले अपडेट, अभिनेत्रीच्या मनात भीती


