Latur: चौघांनी त्याला चौकात गाठलं, 4 जणांनी तलवारीने सपासप केले वार, लातूरमधला भयानक VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
लातूर शहरातील नाईक चौक परिसरात ही घटना घडली आहे. तीन ते चार तरुणांनी एका तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली
शशिकांत पाटील, प्रतिनिधी
लातूर : लातूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. लातूर शहरात कोयता आणि तलवारीसारखा शस्त्राने हल्ला करण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच एका तरुणावर दोन ते तीन तरुणांनी कोयत्याने हल्ला केल्याची घटना ताजी असताना आता तलवारीने एकावर हल्ला केल्याची घटना पुढे आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर शहरातील नाईक चौक परिसरात ही घटना घडली आहे. तीन ते चार तरुणांनी एका तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ३ ते ४ जणांनी या तरुणावर तलवारी, लोखंडी रॉडने हल्ला केला. या तरुणाने स्वत: ला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.
advertisement
पण चारही तरुणांनी त्याच्यावर सपासप तलवारीने वार केले. या या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्याजाच्या पैशातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या व्यक्तींविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप पुढे आलं नाही. फरार आरोपींनी शिवाजीनगर पोलीस शोध घेत आहे.
advertisement
दरम्यान, लातूर शहरात सातत्याने होत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांमुळे शहरात भीतीच आणि दहशतीच वातावरण पसरत असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.
view commentsLocation :
Latur,Latur,Maharashtra
First Published :
November 05, 2025 10:06 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur: चौघांनी त्याला चौकात गाठलं, 4 जणांनी तलवारीने सपासप केले वार, लातूरमधला भयानक VIDEO

