प्रवाशांसाठी गुड न्यूज, सीएसएमटी–पनवेल प्रवास होणार गारेगार, या तारखेपासून धावणार AC लोकल

Last Updated:

या मार्गावर एसी लोकल सेवा सुरू होणार असून, त्यामुळे नवी मुंबईसह मुंबई उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

साडेतीन वर्षांनंतर सीएसएमटी–पनवेल हार्बर मार्गावर एसी लोकलची पुनरागमन, पश्चिम रे
साडेतीन वर्षांनंतर सीएसएमटी–पनवेल हार्बर मार्गावर एसी लोकलची पुनरागमन, पश्चिम रे
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हा नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हार्बर मार्ग तब्बल साडेतीन वर्षांनंतर पुन्हा एकदा एसी लोकलने जोडला जाणार आहे. 26 जानेवारीपासून या मार्गावर एसी लोकल सेवा सुरू होणार असून, त्यामुळे नवी मुंबईसह मुंबई उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हार्बर मार्गावर एसी लोकलची मागणी गेल्या काही काळापासून सातत्याने वाढत आहे. याचवेळी पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलमध्येही प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने काही नॉन-एसी लोकल फेऱ्यांच्या जागी एसी लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
साडेतीन वर्षांनंतर हार्बर मार्गावर एसी लोकलची पुनरागमन
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी प्रवासीसंख्या आणि तीव्र विरोधामुळे मे 2022 मध्ये हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या गाड्या मुख्य मार्गावर वळवण्यात आल्या. मात्र, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातून वाढत असलेल्या प्रवासी मागणीमुळे आता पुन्हा या मार्गावर एसी लोकल सुरू करण्यात येत आहेत.
advertisement
सीएसएमटी–पनवेल मार्गावर सध्या धावणाऱ्या 14 नॉन-एसी लोकल फेऱ्यांच्या ऐवजी एसी लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी दोन फेऱ्या सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत असतील. या एसी लोकल सेवा फक्त सोमवार ते शनिवार या कालावधीतच चालवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
advertisement
पश्चिम रेल्वेवर 12 नवीन एसी फेऱ्यांची भर
दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरही एसी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या चर्चगेट–विरार मार्गावर 109 एसी लोकल फेऱ्या सुरू आहेत. 26 जानेवारीपासून त्यामध्ये 12 नवीन एसी लोकल फेऱ्यांची भर पडणार असून, त्यात सहा अप आणि सहा डाउन फेऱ्यांचा समावेश असेल. या वाढीमुळे पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल फेऱ्यांची एकूण संख्या 121 वर जाणार आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
प्रवाशांसाठी गुड न्यूज, सीएसएमटी–पनवेल प्रवास होणार गारेगार, या तारखेपासून धावणार AC लोकल
Next Article
advertisement
BMC Elections 2026 Voting list: मतदानाला जाताय पण मतदार यादीत नाव कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत...
मतदानाला जाताय पण मतदार यादीत नाव कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत...
  • राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे

  • काही ठिकाणी व्होटर स्लीप पोहचल्या नाहीत.

  • मतदारांना आपलं नाव शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

View All
advertisement