रुचिताने करण समोर हात जोडले, पाया पडली, रडरड रडली, 'बिग बॉस'च्या घरात तिसऱ्याच दिवशी फुल ऑन मेलो ड्रामा

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 : पॉवर कीचा मोह रुचिताला भारी पडणार आहे. तिसऱ्याच दिवशी घरात नव्या संकटाची चाहूल आलेली पाहायला मिळेल.

News18
News18
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी'च्या घराचा दरवाजा उघडून आता जेमतेम तीन दिवस उलटले आहेत, पण वादाची ठिणगी मात्र पहिल्याच दिवसापासून पडली आहे. घरात रणनीती आखताना सदस्य दिसून येत आहेत. पहिल्या दिवशी तन्वीसोबत झालेला राडा आणि त्यानंतर प्रभू शेळकेसोबत झालेली खडाजंगी यांमुळे रुचिता जामदार सध्या घराच्या केंद्रस्थानी आहे. अशातच आता समोर आलेल्या एका नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, बिग बॉसच्या घरातील खेळाला कलाटणी देणारी 'पॉवर की' (Power Key) एका विशिष्ट टास्कदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. बिग बॉस रुचिताला सांगताना दिसत आहेत पॉवर चेंबरमध्ये येण्यासाठी पॉवर की गरजेची आहे. मात्र, या 'पॉवर की' चा वापर करताना रुचिताकडून काहीतरी मोठी चूक घडल्याचे संकेत मिळत आहेत. "पॉवर की ला हलक्यात घेणं, पडलं रुचिताला भारी!" आणि आता हेच तिच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.
ही पॉवर की रुचिताला वाचवणार की तिला थेट अडचणीत टाकणार? या चुकीमुळे तिला घरातील कामांची शिक्षा मिळणार की नॉमिनेशनमध्ये जावं लागणार, हे पाहणं रंजक ठरेल. करणने पॉवर key देण्यास नकार दिला, बिग बॉस यांना सांग पॉवर key करणने घेतली आहे. रुचिता त्याच्या पाया पडताना, त्याची माफी मागताना दिसत आहे. बघूया आता पुढे काय घडणार, आजच्या बिग बॉस मराठीच्या भागात.
advertisement
advertisement
रितेश देशमुखच्या 'लयभारी' स्टाईलमध्ये सुरू झालेला हा सीझन आता हळूहळू 'डेंजर' वळण घेऊ लागला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
रुचिताने करण समोर हात जोडले, पाया पडली, रडरड रडली, 'बिग बॉस'च्या घरात तिसऱ्याच दिवशी फुल ऑन मेलो ड्रामा
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement