प्रसिद्ध मराठी अभिनेता, ज्याने ऐश्वर्या रायसाठी बनवला होता सोन्याचा लेहंगा, 3.5 किलोचा नेकलेस आणि 13 ज्वेलरी सेट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कोण आहे हा मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक ज्याने ऐश्वर्या रायसाठी सोन्याचा लेहंगा, 3.5 किलोचा नेकलेस बनवला होता. पण कशासाठी?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अभिनेत्याने हे सगळं ऐश्वर्याला वैयक्तिक नाही तर तिच्या सिनेमातील खास कॅरेक्टरसाठी केलं होतं. 2008 साली आलेल्या 'जोधा अकबर' या सिनेमाचा हा किस्सा आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक मराठमोळा आशुतोष गोवारिकर होता. कारण दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी मुघल काळातील भव्यता पडद्यावर आणण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.
advertisement
advertisement
'जोधा अकबर' सिनेमात एकूण 300 किलो दागिने वापरले गेले होते. सर्व दागिने तनिष्क ब्रँडकडून खरेदी केले गेले होते. ऐश्वर्याने जोधाबाईच्या लग्नाच्या सीनसाठी 3.5 किलो वजनाचा सेट परिधान केला होता. ऐश्वर्याने चित्रपटात फक्त एक किंवा दोन नाही तर 13 दागिन्यांचे सेट घातले होते. हृतिक रोशनने 8 दागिन्यांचे सेट घातले होते.
advertisement





