Gold Price Today: मकर संक्रांतीला सोनं चांदी रॉकेटच्या स्पीडने सुस्साट, एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दिल्ली व मुंबईत सोन्या चांदीचे दर ऐतिहासिक उच्चांकावर, Donald Trump, Jerome Powell, रशिया युक्रेन संघर्षामुळे बाजारात अस्थिरता.
मकर संक्रांती वर्षातला सर्वात पहिला सण, या सणाला नवरा आपल्या पत्नीसाठी अलंकार घेतो. चांदीच्या वस्तू देतो. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या सामान्यांच्या खिशाला आज मोठी कात्री बसणार आहे. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.
advertisement
आज १४ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव चक्क १,४२,६९० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे, तर चांदीनेही २,७५,१०० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठून नवा विक्रम केला आहे. मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव हा १,४२,५४० रुपये प्रति तोळा तर 22 हजार रुपयांचा भाव हा १,३०,६६० रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव २,७५,१०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी ८५.६४ डॉलर प्रति औंस या विक्रमी स्तरावर व्यवहार करत आहे. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सोन्याचे दान किंवा खरेदी करण्याची परंपरा आहे, मात्र या गगनभेदी किमतींमुळे सामान्य ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे.










