Virat Kohli : 'ओयय.. वहां देख छोटा चिकू बैठा है', छोट्या डुप्लिकेटला पाहून विराटही झाला चकित, रोहितची रिअ‍ॅक्शन काय होती?

Last Updated:

Virat Kohli duplicate Viral Video : बडोदरा येथे न्यूझीलंडविरुद्धचा पहिला वनडे सामना खेळवला गेला. त्यापूर्वी विराटच्या समोर एक छोटा चिकू प्रकट झाला. त्याला पाहून किंग कोहली देखील शॉक झालाय.

Virat Kohli Shock to seeing his childhood look alike viral Rohit sharma
Virat Kohli Shock to seeing his childhood look alike viral Rohit sharma
Virat Kohli reaction on his childhood version : भारताने वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 विकेट्स राखून शानदार विजय मिळवला आहे. या विजयाचा शिल्पकार ठरला तो स्टार फलंदाज विराट कोहली. कोहलीने 93 धावांची दमदार खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र, या सामन्यातील त्याच्या फलंदाजी इतकीच चर्चा मैदानाबाहेर घडलेल्या एका खास प्रसंगाची होत आहे. सामना सुरू होण्यापूर्वी विराट कोहली जेव्हा चाहत्यांना ऑटोग्राफ देत होता, तेव्हा त्याची भेट एका अशा चिमुकल्याशी झाली.

हुबेहुब विराटाच्या लहानपणीसारखा

चिमुकल्याला पाहून विराट स्वतः चकित झाला. तो छोटा मुलगा हुबेहुब विराटाच्या लहानपणीसारखा दिसत होता. विराटला त्या मुलामध्ये आपले बालपण दिसले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य उमटले. मैदानावर सराव आणि ऑटोग्राफ सत्रादरम्यान विराटने अनेक मुलांना ऑटोग्राफ दिलं. त्याच गर्दीत एक छोटा मुलगा उभा होता, ज्याचे रूप आणि डोळे अगदी विराटच्या बालपणीच्या फोटोंशी मिळतंजुळतं होतं. त्याला पाहून विराटची रिअॅक्शन काय होती, यावर चिमुकल्याने स्वत: खुलासा केलाय.
advertisement

काय म्हणाला विराटचा चिमुकला फॅन?

advertisement
मला विराट कोहलीची स्टाईल आवडते. मी जेव्हा त्यांना हाय म्हणालो, तेव्हा त्यांनी मला म्हटलं की मी थोड्या वेळात येतो. तेव्हा तिथं रोहित शर्मा आणि अजून काही जण होते. तेव्हा विराट भैया रोहितला म्हणाला, ओयय तिकडं बघ माझा डुब्लिकेट बसलाय... छोटा चिकू... असं विराट कोहली म्हणाल्याचं छोट्या चिकूने म्हटलंय. त्यावेळी रोहित शर्मा देखील हसायला लागा. तिथं सगळी लोक मला छोटा चिकू छोटा चिकू म्हणू लागले, असंही चिमुकल्याने म्हटलं.
advertisement

विराटने मला आपुलकीने विचारलं

दरम्यान, मी तिथं गेल्यावर रोहित शर्मा, अर्शदीप सिंग, केएल राहुल आणि विराट कोहलीला भेटलो, असं चिमुकल्याने म्हटलं. विराटने मला आपुलकीने विचारलं याचा मला आनंद झाला, असंही तो म्हणाला. मैदानाबाहेरच्या या भावनिक क्षणानंतर विराटने मैदानात आपल्या बॅटनेही कमाल दाखवली. त्याने अत्यंत संयमी आणि आक्रमक फलंदाजी करत 93 धावा केल्या. जरी त्याचे शतक अवघ्या 7 धावांनी हुकले असले, तरी त्याच्या या खेळीने भारताला 4 गडी राखून विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : 'ओयय.. वहां देख छोटा चिकू बैठा है', छोट्या डुप्लिकेटला पाहून विराटही झाला चकित, रोहितची रिअ‍ॅक्शन काय होती?
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement