Kalyan: 21 वर्षीय एअर होस्टेसनं संपवलं जीवन, मोबाईलमध्ये खळबळजनक पुरावे, 5 वर्षापासून भयंकर कृत्य
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Kalyan Crime News: कल्याण पूर्व भागातून एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका २१ वर्षीय एअर होस्टेसने राहत्या घरात जीवन संपवलं आहे.
Kalyan Crime News: कल्याण पूर्व भागातून एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका २१ वर्षीय एअर होस्टेसने राहत्या घरात जीवन संपवलं आहे. तिने गळफास लावून आत्महत्या केली. प्रेम प्रकरणातून झालेला छळ आणि आर्थिक फसवणुकीला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एअर होस्टेसच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेहा पावशे असं आत्महत्या करणाऱ्या २१ वर्षीय एअर होस्टेसचं नाव आहे. ती कल्याण पूर्व परिसरात राहत होती. तिने अचानक आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली असून नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मोबाईलमध्ये खळबळजनक पुरावे
नेहाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याचा तपास करताना पोलिसांना तिचा मोबाईल सापडला. मोबाईलची तपासणी केली असता, त्यात कौशिक प्रकाश पावशे नावाच्या तरुणाने तिला दिलेल्या त्रासाचा उल्लेख असलेला मेसेज आढळला आहे. या एका मेसेजमुळे नेहाच्या मृत्यूमागचं कारण समोर आलं असून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत.
advertisement
लग्नाचे आमिष, मारहाण आणि लाखो रुपयांची फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, नेहा आणि कौशिक यांचं २०२० पासून प्रेमसंबंध होते. म्हणजे तेव्हा नेहाचं वय अवघं १६ वर्षे होतं. तेव्हापासून कौशिकने नेहाला लग्नाचं वचन देऊन अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर, तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार ब्लॅकमेल केलं. आरोपीनं नेहाकडून वेळोवेळी लाखो रुपये उकळल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
advertisement
नेहाची नुकतीच हैदराबादला बदली झाली होती, तिथेही कौशिकने जाऊन तिला बेदम मारहाण केल्याचे पुरावे आता समोर आले आहेत. १६ ते २४ डिसेंबर दरम्यानच्या फोटोंमध्ये तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण स्पष्ट दिसत होते. तसेच, मृत्यूपूर्वी तिच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढली गेल्याचं बँक स्टेटमेंटवरून स्पष्ट होत आहे.
संतापलेले नातेवाईक आणि पोलीस ठाण्यावर घेराव
advertisement
गुन्हा दाखल होऊनही आरोपी कौशिक पावशे अद्याप मोकाट असल्याने नेहाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत आरोपीला अटक करण्याची मागणी केली. आरोपीच्या नातेवाईकांना चौकशीसाठी नेलं असता, संतप्त नातेवाईकांनी पोलिसांची गाडी अडवून मोठा गोंधळ देखील घातला. याप्रकरणी आता कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली असून, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 8:43 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan: 21 वर्षीय एअर होस्टेसनं संपवलं जीवन, मोबाईलमध्ये खळबळजनक पुरावे, 5 वर्षापासून भयंकर कृत्य










