Pune : पुण्यात 'दादाचा वादा', अजित पवारांनी दाखवले निलेश घायवळचे फोटो, हडपसरच्या सभेत काय म्हणाले?

Last Updated:

Pune PMC Election Ajit Pawar On Nilesh Ghaiwal : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची हडपसरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत अजित पवारांनी कुख्यात गुंड निलेश घायवळचे फोटो दाखवले.

Pune PMC Election Ajit Pawar On Nilesh Ghaiwal
Pune PMC Election Ajit Pawar On Nilesh Ghaiwal
Pune PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपला मुक्काम पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ठोकला आहे. अजित पवार यांनी जोरदार प्रचार केला असून आता अखेरचा हात फिरवला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची हडपसरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत अजित पवारांनी कुख्यात गुंड निलेश घायवळचे फोटो दाखवले. याला कुणी पळून लावला तुम्हाला तर माहीतच आहे असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारांवर निशाणा साधला अन् केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील नाव न घेता टीका केली. अजित पवार नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या.

भाजप उमेदवारांचे घायवळसोबतचे फोटो

आम्ही चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केला पण समोरच्यांनी काय उमेदवार दिले. प्रभाग क्रमांक 16 मध्ये ज्या महिला उमेदवार दिलेल्या आहेत, त्याचे पती मटका व्यवसाय करतात. अशा लोकांना उमेदवारी दिली तर काय आपलं होणार याचा विचार करा. पुण्यात तर निलेश घायवळ याच्यासोबत त्यांच्या उमेदवारांचे फोटो आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी भाजप उमेदवारांचे निलेश घायवळसोबतचे फोटो दाखवले. हा पठ्ठ्या याला कुणी मदत केली, सर्वांना माहितीये, असं म्हणत अजित पवार यांनी पुन्हा मुरलीधर मोहोळ यांना डिवचलं. स्वत: टोपी घातली अन् दुसऱ्याला देखील टोप्या घालतायेत, असं म्हणत अजित पवार यांनी चिमटे काढले.
advertisement

तुम्ही फक्त यांना निवडून द्या...

अजित पवार यांनी केशवनगर, मुंढवा, मांजरी, हडपसर या प्रभागात काल रॅली काढली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. रॅलीनंतर दादांनी हडपसरमध्ये भव्य सभा घेतली. यावेळी तुफान गर्दी पहायला मिळाली. अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केलं की, तुम्ही फक्त यांना निवडून द्या, मी यांच्या महोरक्या होतो. मी सुत्र हातात घेतो. पुण्याची व्यवस्था सुधारण्याचं काम माझ्याकडं आलं म्हणून समजा, असं अजित पवार म्हणाले.
advertisement

अखेरच्या दिवशी जोरदार प्रचार

दरम्यान, अजित पवार यांनी यावेळी पाणी व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, ट्रॅफिक याविषयी आश्वासन दिलं. आता अखेरच्या दिवशी देखील अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस देखील पुण्यात आहेत. त्यामुळे आता आजचा दिवस गाजणार यात शंका नाही.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : पुण्यात 'दादाचा वादा', अजित पवारांनी दाखवले निलेश घायवळचे फोटो, हडपसरच्या सभेत काय म्हणाले?
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement