Mumbai Local : मुंबईकरांसाठी मोठी बातमी!14अन् 15 जानेवारीला 288 लोकल रद्द; वेळापत्रक पाहून बाहेर पडा
Last Updated:
Western Railway Block : कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर मंगळवार आणि बुधवार रात्री मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मंगळवार आणि बुधवारच्या रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे तब्बल 288 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
पश्चिम रेल्वेवर मोठा ब्लॉक
कांदिवली-बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका उभारण्याचे काम सुरू असून त्यासाठी 20 डिसेंबर 2025 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेण्यात येत आहेत. या काळात दररोज नियोजित लोकल फेऱ्यांच्या तुलनेत सुमारे 10 ते 15 टक्के लोकल सेवा रद्द होत आहेत. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण वाढली आहे.
advertisement
कोणत्या वेळेत असेल ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री कांदिवली ते मालाड स्थानकांदरम्यान पॉइंट क्रमांक 103 तोडण्यासाठी मोठा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक अप जलद मार्गावर रात्री 12 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत तर डाऊन जलद मार्गावर रात्री 1 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत असेल. तसेच बुधवारी रात्री पॉइंट क्रमांक 102 तोडण्यासाठीही असाच ब्लॉक घेतला जाणार आहे. या दिवशीही अप आणि डाऊन जलद मार्गावर ठरावीक वेळेत वाहतूक बंद राहणार आहे.
advertisement
एक्सप्रेसच्या वेळापत्रकातही बदल
पाचव्या मार्गावरील काम, वेगमर्यादा आणि अन्य कामासाठी अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात येतील. काही गाड्यांच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. 13 आणि 14 जानेवारी रोजी नंदुरबार-बोरिवली आणि अहमदाबाद-बोरिवली एक्स्प्रेस वसई रोडपर्यंतच धावतील. तर 14 आणि 15 जानेवारी रोजी बोरिवलीहून सुटणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्या वसई रोडवरून चालवण्यात येतील.
advertisement
14 आणि 15 जानेवारी रोजी प्रत्येकी 144 लोकल सेवा रद्द राहणार आहेत. गेल्या वर्षी खार रोड ते कांदिवलीपर्यंत सहावी मार्गिका सुरू झाली होती. आता कांदिवली ते बोरिवलीपर्यंत हा विस्तार होत असून भविष्यात लोकल सेवेचा वेळेतपणा सुधारण्यास आणि लोकल फेऱ्या वाढवण्यास याचा मोठा फायदा होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 8:34 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : मुंबईकरांसाठी मोठी बातमी!14अन् 15 जानेवारीला 288 लोकल रद्द; वेळापत्रक पाहून बाहेर पडा









