काहींची मस्ती उतरवायला हवी, दिग्पाल लांजेकरांवर का संतापले अमेय खोपकर?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amey Khopkar on Digpal Lanjekar : मराठी इंडस्ट्रीतील निर्माते आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी निर्माता-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्यावर नाराजी व्यक्त करत थेट आरोप केले आहेत.
जानेवारी 2026 ची सुरुवात 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' या सिनेमाने दणक्यात केली. आता महिन्याच्या शेवटी अर्थात 30 जानेवारी 2026 रोजी अंकुश चौधरी दिग्दर्शित 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' या दोन फिल्म रिलीज होणार आहेत. दरम्यान मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिग्पाल लांजेकर यांच्यावर तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
अमेय खोपकर म्हणाले,"दुसऱ्या सिनेमाला तारीख मिळू दे, थिएटर्स मिळतील, तो सिनेमा चालेल. त्या सिनेमाला दोन-चार आठवडे मिळू दे म्हणून मी असा निर्णय घेतला आहे. आता तीन-चार दिवसांपूर्वी दिग्पाल लांजेकरचा ऐतिहासिक सिनेमा जो आधी 16 फेब्रुवारीला येणार होता, त्याचं तसं पोस्टही लॉन्च झालं होतं, त्याचं काम पूर्ण झालं होतं आणि त्याने अचानक 30 जानेवारीची घोषणा केली. कोणाला काही विचारलं नाही किंवा सांगितलं नाही, थेट घोषणा केली".
advertisement
अमेय खोपकर पुढे म्हणाले आहेत,"मी दुसऱ्या दिवशी दिग्पाल लांजेकरला फोन लावला. मी म्हटलं माझ्या चित्रपटाची तीच तारीख जाहीर केली आहे, हे तुम्ही करू नका. हे चुकीचं आहे. तर त्याने म्हटलं,"ओह. तुमची फिल्म आहे का?". मला हेच कळलं नाही की,'तुमची आहे का फिल्म?' म्हणजे काय? त्यानंतर त्याने सांगितलं की डिस्ट्रिब्युटरचं म्हणणं आहे. त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, डिस्ट्रिब्युटरचा याच्याशी काहीही संबंध नसतो, चित्रपटाची रिलीज डेट ठरवणं हा निर्मात्याचाच निर्णय असतो. मी म्हटलं की,'तुम्ही तारीख बदला, तुमचा मोठा सिनेमा आहे, तुमचा सिनेमादेखील चालला पाहिजे. मी आधी तारीख जाहीर केली आहे, तुम्ही आता असं करू नका".
advertisement
दिग्पालने पुढे कॉल केला नाही आणि माझे कॉल उचललेदेखील नाहीत. मी विषय सोडून दिला, पण मी या गोष्टीचा निषेध करतो. मी फक्त ऐतिहासिक आणि महाराजांवर चित्रपट आहे, म्हणून मी गप्प आहे. दिवसाला तीन-चार चित्रपट येतात आणि आपण मराठी निर्माते गप्प बसतो, काही बोलत नाही, म्हणून काही निर्माते खरंच शेफारले आहेत. काही निर्मात्यांची मस्ती उतरवायला हवी, त्यांना बॅन करण्याची गरज आहे. या पुढेही त्यांनी असंच केलं तर निर्माता संघ आणि महामंडळाला सांगेन की, दिग्पाल लांजेकरला बॅन करा", असं म्हणत खोपकरांनी आपला निषेध व्यक्त केला आहे.
advertisement








