Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत वारं फिरलं, आता पुन्हा थंडीची लाट येणार, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Mohan Najan
Last Updated:
उत्तर भारतातून येणाऱ्या थंडीचा प्रभाव कमी होऊन कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान बदलत असल्याने, ठाण्यातही हवामानात सौम्य बदल अपेक्षित आहेत. 15 जानेवारी रोजी कल्याण डोंबिवली सह इतर भागातील हवामान अंदाज बघुयात.
राज्यात एकाच वेळी थंडी आणि पावसाची शक्यता असल्याने, हवामान विभागानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत ढगाळ हवामानासोबत गारठा कमी होण्याची शक्यता आहे, उत्तर भारतातून येणाऱ्या थंडीचा प्रभाव कमी होऊन कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान बदलत असल्याने, ठाण्यातही हवामानात सौम्य बदल अपेक्षित आहेत. 15 जानेवारी रोजी कल्याण डोंबिवली सह इतर भागातील हवामान अंदाज बघुयात.
advertisement
advertisement
advertisement
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ, काही ठिकाणी धुके असू शकते, किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33अंश सेल्सिअस असून ज्यामुळे दिवसा उबदारपणा जाणवेल.आज प्रदूषणामुळे अस्वस्थता वाढू शकते, असे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना मास्क वापरावा.
advertisement
बदलापूरमध्ये हवामान मुख्यत्वे स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमान 07 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस असेल,त्यामुळे हवामान सुखद आणि काही ठिकाणी थंड राहील. शहापूर मुरबाड आज उन्हाळी हवामानाची शक्यता आहे. ज्यात तापमान दिवसा 20 अंश तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस असेल,सकाळची हवा चांगली असली तरी प्रदूषण वाढू शकते, विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी.




