advertisement

चुकीच्या दिशेला गुढी उभारणं पडेल महागात, 'ही' दिशा ठरणार खास; घरात नांदेल सुख-समृद्धी

Last Updated:

हिंदू धर्मात 'साडेतीन मुहूर्तांपैकी' एक मानला जाणारा गुढीपाडवा हा सण 19 मार्च 2026 रोजी साजरा होत आहे. या दिवसापासून 'पराभव' नावाचे नवीन संवत्सर सुरू होत आहे.

News18
News18
Gudi Padwa 2026 : हिंदू धर्मात 'साडेतीन मुहूर्तांपैकी' एक मानला जाणारा गुढीपाडवा हा सण 19 मार्च 2026 रोजी साजरा होत आहे. या दिवसापासून 'पराभव' नावाचे नवीन संवत्सर सुरू होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारणे हे केवळ परंपरेचे प्रतीक नसून ते विजय आणि समृद्धीचे लक्षण मानले जाते. मात्र, वास्तूशास्त्रानुसार गुढी कोणत्या दिशेला उभारावी, याचे काही नियम आहेत. चुकीच्या दिशेला गुढी उभारल्याने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, तर योग्य दिशा तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवे मार्ग उघडू शकते.
गुढी उभारण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम दिशा
वास्तूशास्त्रानुसार, गुढी उभारण्यासाठी घराची पूर्व दिशा सर्वात शुभ मानली जाते. पूर्व दिशा ही सूर्याची आणि ऊर्जेची दिशा आहे. सूर्याची पहिली किरणे गुढीवर पडल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. जर तुम्हाला पूर्व दिशेला जागा नसेल, तर तुम्ही ईशान्य कोपऱ्यातही गुढी उभारू शकता. ईशान्य कोपरा हा ईश्वराचा मानला जातो, ज्यामुळे घरातील सुख-शांती कायम राहते.
advertisement
चुकीच्या दिशेचे परिणाम
गुढी कधीही घराच्या दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला उभारू नये. दक्षिण दिशा ही यमाची आणि पितरांची मानली जाते. या दिशेला विजयाचे प्रतीक असलेली गुढी उभारणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील सदस्यांमध्ये चिडचिड वाढू शकते किंवा आर्थिक कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. गुढी नेहमी मोकळ्या आणि स्वच्छ जागी उभारावी. जिथे कचरा किंवा चपलांचे स्थान असेल, तिथे गुढी उभारणे टाळावे.
advertisement
गुढी उभारताना 'या' वास्तू टिप्स पाळा
गुढी उभारताना काही गोष्टींचे भान ठेवल्यास घरामध्ये वर्षभर भरभराट होते.
उंची: गुढी जमिनीला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने उंच जागी आणि किंचित बाहेरच्या दिशेला झुकलेली असावी.
रांगोळी आणि तोरण: गुढीच्या खाली जमिनीवर सुंदर रांगोळी काढा आणि मुख्य दरवाजाला आंबा किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावा. यामुळे घराची संरक्षण शक्ती वाढते.
advertisement
साहित्य: तांब्याचा कलश पालथा घालताना त्यावर कुंकवाने 'स्वस्तिक' नक्की काढा. स्वस्तिक हे सर्व अडथळे दूर करणारे चिन्ह आहे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
चुकीच्या दिशेला गुढी उभारणं पडेल महागात, 'ही' दिशा ठरणार खास; घरात नांदेल सुख-समृद्धी
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement