advertisement

Viral Vs Bacterial Fever : व्हायरल ताप आणि बॅक्टेरियल तापातील फरक कसा ओळखावा? डॉक्टरांनी दिली माहिती

Last Updated:
How to identify viral and bacterial fever : वातावरण बदललं की आजारांचं धोका वाढतो. हल्ली ऊन फार आहे. पण मधेच वातावरण बदलतं आणि गारवा येतो. अशा सारख्या बदलत्या परिस्थितीमुळे तापाची शक्यता वाढते. पण ताप आल्यावरही तो व्हायरल आहे की बॅक्टेरियल हे आपल्याला बऱ्याचदा कळत नाही. यावर डॉक्टरांनी महत्त्वाची माहितीत दिली आहे.
1/9
तापामध्ये बऱ्याच लोकांना माहिती असलेल्या नियमित गोळ्या घ्यायची सवय असते. मात्र जेव्हा आपल्याला ताप व्हायरल आहे की बॅक्टेरियल हे माहित असेल तेव्हा या औषधांनी आपल्याला बरं वाटत नाही आणि अशा प्रकारे गोळ्या घेण्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. म्हणूनच आपल्याला या दोन्हीतील फरक माहित असावा.

2/9
तापत फरक कसा ओळखायचा याबद्दल लखनऊ येथील मेदांता हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. लोकेंद्र गुप्ता यांनी न्यूज18 ला माहिती दिली आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, हल्ली हवामान बदलामुळे बहुतांश लोकांना व्हायरल इन्फेक्शन होते. यामुळे ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो.

3/9
ताप आल्यानंतर आपल्याला माहिती असलेले कोणतेही औषध घेणं टाळावं. डॉक्टरांच्या मते, अचानक ताप आला तर फक्त पॅरासिटामॉल घ्या. यामुळे तुमचा तापही कमी होईल आणि अंगदुखीही कमी होईल.

4/9
डॉक्टरांनी सांगितलं की, व्हायरल ताप 3 ते 5 दिवसांत आपोआप बरा होतो. याउलट बॅक्टेरियल ताप हळूहळू सुरू होऊ शकतो. पण जास्त काळ टिकतो. म्हणूनच जर पॅरासिटामॉल घेतल्यानंतर 4-5 दिवसांत तुमचा ताप कमी होत नसेल, तर त्वरित डॉक्टरांकडे जा.

5/9
डॉक्टरांनी सांगितलं की, व्हायरल तापामध्ये खोकला, घसादुखी आणि स्नायूदुखी हे त्रास होऊ शकते. मात्र बॅक्टेरियल तापामध्ये मूत्रमार्गाचा संसर्ग, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, पोटदुखी आणि कानदुखी अशी लक्षणे दिसू शकतात.

6/9
बॅक्टेरियल तापामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक्स घ्यायला हवीत. बऱ्याचदा कफाच्या रंगावरूनही संसर्ग ओळखता येऊ शकतो.

7/9
बॅक्टेरियल इनफेक्शनमध्ये कफ पाण्यासारखा असतो, तर व्हायरलमध्ये कफाचा रंग गडद पिवळा किंवा हिरवा दिसू शकतो. मात्र हे प्रत्येकवेळी असंच होईल असं नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांकडे जाणं टाळू नका.

8/9
या सर्वांवरून तुम्हाला व्हायरल आणि बॅक्टेरियल तापातील फरक तर कळेल. मात्र तरीही डॉक्टरानाच्याच सल्ल्याने औषध घेणं योयीग्य आहे. कारण तुमच्या शारीरिक परिस्थितीनुसार कोणत्या औषधांचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होईल हे फक्त डॉक्टरच सांगू शकतात.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement