advertisement

Hair Care Tips : एका वर्षात केसांना किती वेळा कलर करणं योग्य? डर्माटॉलॉजिस्टने सांगितलं योग्य प्रमाण

Last Updated:
Dermatologist advice to color hair : कोणत्याही कार्यक्रमासाठी तयार होताना मेकअपसोबतच हेअर स्टाईल कारणंही तितकंच महत्त्वाचं असतं. यामुळे आपला लूक पूर्ण होतो. बऱ्याच मुलींना केस कलर करण्याचीही खुप आवड असते. पण वर्षातून कितीवेळा हेअर कलर करणं सुरक्षित असतं हे तुम्हाला माहित आहे का?
1/9
हेअर कलरमुळे आपले केस छान तर दिसतात. पण त्याचा आपल्या केसांवरही निश्चितच परिणाम होतो. आपण जे हेअर कलर करतो, त्यामध्ये बहुतांशी केमिकल्स मिसळलेले असतात. त्यामुळे केसांवर आपण वर्षातून किती वेळा हे कलर वापरू शकतो हे जाणून घेणं आवश्यक आहे.

2/9
शारदाकेअर-हेल्थसिटी येथील त्वचारोगतज्ञ डॉ. शितिज गोयल यांनी लाईव्ह हिंदुस्थानची बोलताना सांगितलं की, तुम्ही जर वारंवार केसांना कलर लावत असाल तर त्याचा परिणाम आपल्या केसांच्या आणि टाळूच्या आरोग्यावर होतो. वारंवार रासायनिक हेअर डाय वापरल्याने केसांचा पोत म्हणजेच टेक्श्चर, मजबुती आणि टाळूवरही परिणाम होतो.

3/9
केसांमध्ये रंग खोलवर जावा यासाठी हेअर कलरमध्ये अमोनिया, हायड्रोजन पेरॉक्साइड आणि पीपीडी सारखी रसायने असतातयामुळे केसांना गडद रंग जरी येत असला तर केसांची अंतर्गत प्रथिन रचना कमकुवत होते आणि केसातील नैसर्गिक ओलावा नाहीसा होतो. यामुळे केस ठिसूळ होतात आणि धुताना किंवा विंचरताना तुटू शकतात.

4/9
वारंवार हेअर कलर केल्याने टाळूची जळजळ होऊ शकते आणि संवेदनशीलता वाढू शकते. हेअर कलरमधील केमिकल्स टाळूच्या संपर्कात आल्याने खाज सुटणे, लालसरपणा, जळजळ आणि कधीकधी अ‍ॅलर्जीमुळे पुरळ येऊ शकते. म्हणून कोणताही डाय लावण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करा.

5/9
याबद्दल सर्वाना माहित असेलच वारंवार केमिकल असलेले हेअर डाय वापरल्यामुळे केस तुटणे आणि पातळ होण्याची शक्यता वाढते. कारण या रांगांमधील रसायनं केसांमध्ये शिरून त्यांची नैसर्गिक ताकद आणि ओलावा कमी करतात. यामुळे केस कमकुवत आणि पातळ होतात. म्हणून डाय लावल्यानंतर डीप कंडिशनिंग आणि हीलिंग मास्क वापरा.

6/9
हेअर कलरमधील केमिकल्सचा केसांच्या क्यूटिकल्सवर परिणाम होतो. यानंतर केस कोरडे, कुरळे होतात आणि ते सहज मॅनेज होत नाहीत. नसर्गिक ओलावा नसल्यामुळे केस निस्तेज, निर्जीव आणि ठिसूळ होतात. म्हणून दर 2-3 आठवड्यांनी डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट घ्या किंवा हीलिंग मास्क लावा.

7/9
डॉ. शितिज यांनी सांगितले की, तुम्ही दर 1-2 महिन्यांनी केसांचा रंग बदलत असाल, तर हे चुकीचे आहे. कारण यामुळं तुमच्या केसांना पूर्ववत होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, ज्यामुळे हळूहळू केसांचे नुकसान वाढवू लागते.

8/9
केस आणि टाळूवर होणारा केमिकल्सचा परिणाम कमी करण्यासाठी तज्ञ वर्षातून फक्त 3-4 वेळाच केसांना रंग लावण्याचा सल्ला देतात. तुम्ही या अंतराने हेअर कलर केलात तर तुमचे केस नेहमी सुरक्षित आणि चांगले राहतील.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement