advertisement

IND vs NZ : '... तरीही आम्हाला मॅच जिंकता आली नसती', शुभमन गिलने सांगितल्या टीम इंडियाच्या तीन घोडचुका! कुणावर खापर फोडलं?

Last Updated:

Shubhman Gill Statement On IND vs NZ : आपण 15 ते 20 रन्स अधिक केले असते, तरीही विकेट्सशिवाय टार्गेट वाचवणं कठीण गेलं असतं, असं परखड मत शुभमन गिलने मांडलं आहे.

Shubhman Gill Statement On IND vs NZ
Shubhman Gill Statement On IND vs NZ
India vs New Zealand : न्यूझीलंडच्या डॅनियल मिचेल याने अतितटीच्या सामन्यात छातीचा कोट केला अन् धमाकेदार शतक ठोकलं. एवढंच नाही तर मिचेलने न्यूझीलंडला विजय देखील मिळवून दिला. मिचेलने 117 बॉलमध्ये 131 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 11 फोर आणि 2 सिक्स मारले. अशातच आता मालिकेत न्यूझीलंडने 1-1 ने बरोबरी साधली असून आता टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. अशातच कॅप्टन शुभमन गिल याने पराभवानंतर संताप व्यक्त केला अन् टीम इंडियाच्या चुका सांगितल्या.

काय म्हणाला शुभमन गिल?

शुभमन गिलच्या मते, मधल्या ओव्हर्समध्ये विकेट्स न मिळाल्याने टीमला मोठा फटका बसला. 30 यार्डच्या सर्कलमध्ये 5 फिल्डर्स असताना जर तुम्ही विकेट्स घेतल्या नाहीत, तर धावसंख्या रोखणे कठीण होते. आपण 15 ते 20 रन्स अधिक केले असते, तरीही विकेट्सशिवाय टार्गेट वाचवणं कठीण गेलं असतं, असं परखड मत शुभमन गिलने मांडलं आहे.
advertisement

मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं

बॅटिंगबद्दल बोलताना शुभमनने सांगितलं की, अशा खेळपट्टीवर मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं असतं. सेट झालेल्या बॅट्समनने मोठी खेळी करणं आवश्यक आहे, कारण नवीन येणाऱ्या खेळाडूसाठी लगेच फटकेबाजी करणं सोपं नसतं. भारताने पहिल्या 10 ओव्हर्समध्ये चांगली बॉलिंग केली आणि प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण केला, मात्र समोरच्या टीमने मधल्या ओव्हर्समध्ये संयमी बॅटिंग करत मॅच आपल्या बाजूने झुकवली.
advertisement

कॅच सोडणं महागात पडलं - शुभमन गिल

दरम्यान, पिचच्या परिस्थितीवर भाष्य करताना तो म्हणाला की, सुरुवातीच्या 15 ओव्हर्समध्ये बॉल चांगला हालचाल करत होता, मात्र 25 ओव्हर्सनंतर पिच थोडे शांत झाले. अशा वेळी बॉलिंग करताना अधिक धाडसी निर्णय घेण्याची आणि चान्स घेण्याची गरज होती. फिल्डिंगमधील चुकांवरही त्याने नाराजी व्यक्त केली. कॅच सोडणं महागात पडलं असून, फिल्डिंग हा असा विभाग आहे, जिथं टीमला अजून खूप सुधारणा करण्याची गरज असल्याचं शुभमन गिलने मान्य केलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : '... तरीही आम्हाला मॅच जिंकता आली नसती', शुभमन गिलने सांगितल्या टीम इंडियाच्या तीन घोडचुका! कुणावर खापर फोडलं?
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement