मतदान सुरू होऊन एक तासही झाला नाही तरीसुद्धा राज्यात ठिक ठिकाणी EVM मशीन बंद पडायला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, अमरावती, धुळे, सोलापूर यापाठोपाठ आता पुण्यातही EVM मशीन बंद असल्याची माहिती मिळाली आहे.
कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवलीतील मोठा गाव महापालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान केले.
मतदारांना आज संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तुमचं वोटर आयडी नसेल तर तुम्ही 12 कागदपत्र घेऊन मतदान केंद्रावर जाऊ शकता. त्या मदतीनं मतदार यादीत नाव शोधून मतदान करू शकता.
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 5 मधील मशीन बंद, अमरावती, धुळे, सोलापूर, कोल्हापूरनंतर आता इथेही मशीनमध्ये बिघाड
EVM मशीनमध्ये बिघाड, 7.30 वाजल्यापासून मतदार खोळंबले, केंद्राबाहेर मोठी गर्दी लांब रांगा
वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार यादी मध्ये घोळ, एकाच घरातील कुटुंबीयांना वेगवेगळ्या ठिकाणी विभागले मतदानाचा टक्का घसरणार. वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज मतदान होत आहे मात्र या मतदानाच्या वेळी मतदार यादीतील घोळामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची दाट शक्यता आहे. एकाच घरातील कुटुंबीयांना वेगवेगळ्या ठिकाणी विभागल्यामुळे मतदानावर मोठा परिणाम होणार आहे.
अमरावतीत मतदानाबाबत जागरूकतेचे उदाहरण समोर आले आहे. अमरावती येथील मतदार आशिक खान आणि समसूनिसा खान या दाम्पत्याने आज सकाळी ठीक 7.30 वाजता आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान पार पडल्यानंतर हे दाम्पत्य पुढील प्रवासासाठी सौदी अरेबियातील बहरीन येथे रवाना झाले. विशेष बाब म्हणजे त्यांचा मुलगा फिरोज खान हा सध्या बहरीन देशात वास्तव्यास आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असताना पुन्हा भाजप महानगरपालिकेत सत्ता अजमावेल असा विश्वास पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. एकूण 78 जागांवर ही लढत होत असून यापैकी 66 जागा आम्ही जिंकू अस देखील त्यांनी यावेळी म्हटल आहे.
नांदेड महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्रमांक एक तरोडा येथे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मतदान केले. याच प्रभागातून त्यांचा मुलगा सुहास कल्याणकर शिवसेनेचे उमेदवार आहेत.
धुळे शहरातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रांमध्ये बिघाड
मतदान प्रक्रिया खोलबळी
प्रभाग 10, प्रभाग 4 व प्रभाग क्रमांक 11 मध्ये ईव्हीएम मशीन खराब
तांत्रिक बिघाडामुळे मशीन बंद
सुमारे वीस मिनिटात मशीन बंद
प्रशासनाच्या वतीने तात्काळ मशीन मधील तांत्रिक अडचण दूर करत पुन्हा मशीन सुरू करण्याचा प्रयत्न
सोलापुरातील ITI महाविद्यालय मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया अद्याप सुरूच नाही
EVM मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील अर्धातपासून मतदान नाही
अद्याप या केंद्रावर एक ही मतदान झालेले नाही
निवडणुक कर्मचाऱ्याकडून मशीन दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरु
मात्र सकाळी मतदाणासाठी आलेले नागरिक ताटकळत
किशोरी पेडणेकर यांनी हनुमानाचं दर्शन घेतलं
मुंबईच्या माजी महापौर यांनी घेतलं हनुमानाचं दर्शन
थोड्याच वेळात मतदान केंद्रावर पोहोचणार
आपला मतदानाचा हक्क बजावणार
अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्र 23 येथील ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड
पंधरा मिनिटांपासून मशीन बंद असल्याने मतदार मतदान केंद्राच्या बाहेर उभे
साडेसात वाजता पासून या मतदानाला सुरुवात झाली असून अजूनही या ठिकाणची मशीन बंद असल्याने मतदार मात्र मतदान केंद्राच्या बाहेर उभे
शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सपत्नीक मतदान केले. पनवेलच्या नावडे गावातील मराठी शाळेमध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
एकूण ७८ जागांसाठी हे मतदान पार पडत आहे. ६००च्या आसपास उल्हासनगर शहरातील विविध ठिकाणी मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. यामध्ये शाळा ,सरकारी कार्यालय आणि खाजगी ठिकाणांचा समावेश आहे. उल्हासनगर शहरात मतदार संख्या एकूण ४ लाख ३९ हजार ९१२ इतकी आहे.
जळगाव शहरात मतदान सुरू होण्यापूर्वी एका मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक १५ येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मांडणीचा क्रम चुकल्याचा आरोप उमेदवार प्रतिनिधींनी केला. ईव्हीएम मशीनचा मांडणीचा क्रम नियमांनुसार नसल्याने तो तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी उमेदवार प्रतिनिधींनी केली. यावरून निवडणूक कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळाने निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत उमेदवार प्रतिनिधींची मागणी मान्य केली आणि ईव्हीएम मशीनचा क्रम पुन्हा योग्य पद्धतीने लावण्यात आला. दरम्यान, मशीनचा क्रम तसेच पोलिंग एजंटला बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याबाबतही उमेदवार प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. उमेदवार प्रतिनिधींची मागणी केल्यानंतर वातावरण शांत झाले.



