Vasai : सण साजरा करायला पाहुण्यांकडे गेले अन् परतलेच नाहीत; मकरसंक्रांतीला बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू

Last Updated:

Father Daughter Death : मकरसंक्रांतीच्या दिवशी विरार पूर्वेकडील बरफपाडा भागात एका खदाणीत बुडून वडील आणि अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

News18
News18
विरार : विरार पूर्वेकडील बरफपाडा परिसरात मकरसंक्रांतीच्या दिवशी एक हृदयद्रावक घटना घडली. बुधवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास एका खदाणीत बुडून वडील आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. विनायक सितप (वय 48)आणि त्यांची मुलगी ईकांशा सितप (वय 15) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही मुंबईतील जोगेश्वरी परिसरात वास्तव्यास होते.
पाहुण्यांकडे गेलेल्या बाप-लेकीचा मृत्यू
मकरसंक्रांतीनिमित्त विनायक सितप हे आपल्या कुटुंबासह विरार येथील बरफपाडा परिसरात नातेवाईकांकडे आले होते. सणाच्या आनंदात दुपारी विनायक सितप हे पोहण्यासाठी घराजवळील खदाणीकडे गेले. मात्र खदाणीतील पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज न आल्याने ते अचानक बुडू लागले.
वडिलांना पाण्यात बुडताना पाहताच त्यांची मुलगी ईकांशा हिने कोणताही विचार न करता वडिलांना वाचविण्यासाठी खदाणीत उडी घेतली. मात्र पाण्याची खोली अधिक असल्याने आणि पोहता न आल्याने ईकांशालाही पाण्यात अडकावे लागले. काही क्षणांतच वडील आणि मुलगी दोघेही पाण्यात बुडाले.
advertisement
घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
मकरसंक्रांतीसारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांनी खदाण्यांजवळ विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Vasai : सण साजरा करायला पाहुण्यांकडे गेले अन् परतलेच नाहीत; मकरसंक्रांतीला बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू
Next Article
advertisement
BMC Elections 2026 Voting list: मतदानाला जाताय पण मतदार यादीत नाव कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत...
मतदानाला जाताय पण मतदार यादीत नाव कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत...
  • राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे

  • काही ठिकाणी व्होटर स्लीप पोहचल्या नाहीत.

  • मतदारांना आपलं नाव शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

View All
advertisement