Pune Election : पुण्यात ईव्हीएमचा नवा घोळ? तीन मतदान झालं चौथ्या मतदानाला..., अंकुश काकडेंचा गंभीर आक्षेप
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Pune Election: पुणे महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते अंकुश काकडे यांनी ईव्हीएम मशीनच्या कार्यप्रणालीवर आक्षेप नोंदवला आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठीचे मतदान सुरू झाले आहे. ठिकठिकाणी मतदारांनी रांगा लावण्यास सुरुवात केल्या आहेत. तर, दुसरीकडे काही ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते अंकुश काकडे यांनी ईव्हीएम मशीनच्या कार्यप्रणालीवर आक्षेप नोंदवला आहे.
अंकुश काकडे यांच्या म्हणण्यानुसार, मतदान केंद्रावर पहिल्या तीन मतदानांनंतर चौथ्या मतदानाच्या वेळी मशीनवरील लाईटच पेटली नाही. त्यामुळे मतदान प्रक्रिया योग्य पद्धतीने झाली की नाही, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय, संबंधित ईव्हीएम मशीनमध्ये वेळेचा मोठा फरक आढळून आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ईव्हीएमच्या वेळेत फरक...
ईव्हीएम मशीनमध्ये वेळ सात वाजून ४४ मिनिटे दाखवली जात होती, जी प्रत्यक्ष वेळेपेक्षा तब्बल १४ मिनिटांनी जास्त असल्याचा दावा अंकुश काकडे यांनी केला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत असून, निवडणूक प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
advertisement
या आरोपांमुळे पुणे महापालिका निवडणुकीत ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 8:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Election : पुण्यात ईव्हीएमचा नवा घोळ? तीन मतदान झालं चौथ्या मतदानाला..., अंकुश काकडेंचा गंभीर आक्षेप









