Municipal Corporation Election 2026: वोटर आयडी नाही, तरीही करता येईल मतदान, कसं? 12 पैकी एक कोणतंही डॉक्युमेंट घेऊन जा!

Last Updated:

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार ओळखपत्र नसले तरी आधार, पॅन, पासपोर्टसारख्या कागदपत्रांवर मतदान करता येईल, नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे.

News18
News18
आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आपल्या शहराचा कारभारी निवडण्यासाठी लाखो मुंबईकर आज घराबाहेर पडतील. मात्र, अनेक मतदारांच्या मनात एकच धाकधूक असते, माझ्याकडे मतदार ओळखपत्र नाही, मग मी मतदान कसं करु? तर अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे जरी मतदार ओळखपत्र नसेल तरीही तुम्ही मतदान करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे यापैकी कोणतंही एक कागदपत्र असणं आवश्यक आहे.
मतदान केंद्रावर जाताना काय कराल?
तुमचे नाव यादीत असेल, तर तुमच्या घरी आलेल्या किंवा तुम्ही ऑनलाइन डाऊनलोड केलेल्या निवडणूक स्लिपची (Voter Slip) प्रिंट घेऊन केंद्रावर जा. या स्लिपसोबत ओळख पटवण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक अधिकृत कागदपत्र तुम्ही सोबत नेऊ शकता:
१. आधार कार्ड २. पॅन कार्ड ३. ड्रायव्हिंग लायसन्स ४. बँक किंवा पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक ५. पासपोर्ट (पारपत्र) ६. मनरेगा जॉब कार्ड ७. आरोग्य विमा स्मार्ट कार्ड ८. पेन्शन कार्ड (फोटोसह) ९. केंद्र किंवा राज्य सरकारचे अधिकृत ओळखपत्र १०. दिव्यांग ओळखपत्र ११. खासदार किंवा आमदारांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र १२. राष्ट्रीय लोकसंख्या कार्ड
advertisement
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, तुमच्याकडे अधिकृत मतदार ओळखपत्र नसेल तरीही तुम्ही मतदान करू शकता. यासाठी सर्वात महत्त्वाची अट एकच आहे, ती म्हणजे तुमचे नाव अधिकृत मतदार यादीत असणे आवश्यक आहे. जर तुमचं नावच मतदार यादीमध्ये नसेल तर तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.
नका ठेवू कोणतीही शंका!
अनेकदा जुन्या ओळखपत्रावरील फोटो अस्पष्ट असतो किंवा नाव बदललेले असते, अशा वेळी वरीलपैकी आधार किंवा पॅन कार्ड तुमच्यासाठी सर्वात सोपा पर्याय ठरू शकतो. दिव्यांग मतदारांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्रावर विशेष रांगा आणि सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Municipal Corporation Election 2026: वोटर आयडी नाही, तरीही करता येईल मतदान, कसं? 12 पैकी एक कोणतंही डॉक्युमेंट घेऊन जा!
Next Article
advertisement
BMC Elections 2026 Voting list: मतदानाला जाताय पण मतदार यादीत नाव कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत...
मतदानाला जाताय पण मतदार यादीत नाव कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत...
  • राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे

  • काही ठिकाणी व्होटर स्लीप पोहचल्या नाहीत.

  • मतदारांना आपलं नाव शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

View All
advertisement