Thane Crime : कल्याणच्या एअर होस्टेस मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, Whats App चॅटमधून खळबळजनक खुलासा!

Last Updated:

Kalyan airhostess neha death Case : शेवटचा व्यवहार 16 डिसेंबर 2025 रोजी झाला होता. इतकंच नाही तर, आरोपीने तिचे खासगी फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिला वारंवार मारहाण केल्याचेही चॅट्सवरून स्पष्ट झालं आहे.

News18
News18
Thane Crime New : मुंबईतील कल्याण पूर्व येथील 29 वर्षीय एअर होस्टेसने 28 डिसेंबर 2025 रोजी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. सुरुवातीला ही घटना केवळ एक आकस्मिक मृत्यू वाटत होती, परंतु कोळसेवाडी पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासानंतर या प्रकरणाला 10 जानेवारी रोजी वेगळे वळण मिळालं. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या 23 वर्षीय माजी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा एफआयआर (FIR) नोंदवला आहे. मृत तरुणीच्या मोबाईलमधील चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केल्यानंतर पोलिसांच्या हाती अनेक धक्कादायक पुरावे लागले आहेत.

लाखो रुपये उकळले, वारंवार मारहाण

तपासादरम्यान असं समोर आलं की, आरोपी आणि पीडिता गेल्या पाच वर्षांपासून म्हणजेच 2020 पासून एकमेकांच्या संपर्कात होते. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून लाखो रुपये उकळले असून, शेवटचा व्यवहार 16 डिसेंबर 2025 रोजी झाला होता. इतकंच नाही तर, आरोपीने तिचे खासगी फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिला वारंवार मारहाण केल्याचेही चॅट्सवरून स्पष्ट झालं आहे. दुसऱ्या महिलेशी संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार दिल्याने ती प्रचंड मानसिक दडपणाखाली होती. या सर्व छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
advertisement

मानसिक आणि शारीरिक त्रास

तपासादरम्यान पीडितेच्या मोबाईलमधील चॅट्समधून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. आरोपीने तिचे काही खासगी फोटो सार्वजनिक करण्याची धमकी दिली होती आणि तो तिला वारंवार मारहाण देखील करत होता. तिच्या शरीरावरील खुणा आणि चॅट रेकॉर्ड्सवरून तिला देण्यात आलेला मानसिक आणि शारीरिक त्रास स्पष्ट झाला आहे. या सातत्यपूर्ण छळाला कंटाळून अखेर तिने आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.
advertisement

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे उच्चशिक्षित तरुण-तरुणींमध्ये असलेल्या असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. अशा कठीण परिस्थितीत तरुणांनी नैराश्याला बळी न पडता कायदेशीर मार्ग अवलंबणे गरजेचं असल्याचं आवाहन करण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Crime : कल्याणच्या एअर होस्टेस मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, Whats App चॅटमधून खळबळजनक खुलासा!
Next Article
advertisement
BMC Elections 2026 Voting list: मतदानाला जाताय पण मतदार यादीत नाव कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत...
मतदानाला जाताय पण मतदार यादीत नाव कसं शोधायचं? जाणून घ्या सोपी पद्धत...
  • राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे

  • काही ठिकाणी व्होटर स्लीप पोहचल्या नाहीत.

  • मतदारांना आपलं नाव शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

View All
advertisement