Tejaswini Pandit : मतदानानंतर व्यक्त झाली तेजस्विनी पंडित, आणखी एक पोस्ट चर्चेत

Last Updated:
Tejaswini Pandit Post : अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं मतदान केल्यानंतर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. तेजस्विनीने पोस्टमध्ये काय लिहिलंय?
1/9
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेतील काही मुद्द्यांवरून वातावरण चांगलंच तापलं आहे. मतदान केंद्रातील भोंगळ कारभार, कधी मशीन बंद पडणं तर बोटाला मार्करने शाई लावणं असं अनेक प्रकार समोर आलेत.

advertisement
2/9
सोशल मीडियावर सध्या या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. अनेक कलाकारांनीही यावर भाष्य केलं आहे. व्हिडीओ आणि फोटो शेअर करत बोटावरची शाई पुसली गेल्याचं सांगितलं आहे.
सोशल मीडियावर सध्या या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. अनेक कलाकारांनीही यावर भाष्य केलं आहे. व्हिडीओ आणि फोटो शेअर करत बोटावरची शाई पुसली गेल्याचं सांगितलं आहे.
advertisement
3/9
दरम्यान प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची पोस्ट समोर आली आहे. तेजस्विनीनं देखील संपूर्ण शाई प्रकरणावर नाराजी व्यक्त करत चॅलेंज दिलं आहे.
दरम्यान प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची पोस्ट समोर आली आहे. तेजस्विनीनं देखील संपूर्ण शाई प्रकरणावर नाराजी व्यक्त करत चॅलेंज दिलं आहे.
advertisement
4/9
तेजस्विनीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय,
तेजस्विनीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "माझा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला. मी लहानाची मोठी मराठी भाषा बोलतंच झाले. ह्याच मराठी भाषेवर कामा रूपी स्वतःचं पोट भरत आले."
advertisement
5/9
 "माझी भाषा टिकली तर माझं काम दिसेल आणि तरचं माझं अस्तित्वही असेल… म्हणूनच आजचं मत त्या मराठी माणसासाठी, ज्याच्या रक्तात मराठी सळसळते आणि ज्याच्या हृदयात आजन्म महाराष्ट्र विराजमान आहे."
"माझी भाषा टिकली तर माझं काम दिसेल आणि तरचं माझं अस्तित्वही असेल… म्हणूनच आजचं मत त्या मराठी माणसासाठी, ज्याच्या रक्तात मराठी सळसळते आणि ज्याच्या हृदयात आजन्म महाराष्ट्र विराजमान आहे."
advertisement
6/9
तेजस्विनीने पोस्टच्या शेवटी लिहिलंय,
तेजस्विनीने पोस्टच्या शेवटी लिहिलंय, "बाकी ह्या वर्षी त्या मार्करची शाई निघून जाणार की लोकशाही ते बघूया"
advertisement
7/9
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची भावनिक आणि ठाम भूमिका मांडणारी सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि लोकशाही मूल्यांवर भाष्य करत तेजस्विनीने आपलं मत स्पष्ट शब्दांत मांडलं आहे.अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची भावनिक आणि ठाम भूमिका मांडणारी सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि लोकशाही मूल्यांवर भाष्य करत तेजस्विनीने आपलं मत स्पष्ट शब्दांत मांडलं आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची भावनिक आणि ठाम भूमिका मांडणारी सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि लोकशाही मूल्यांवर भाष्य करत तेजस्विनीने आपलं मत स्पष्ट शब्दांत मांडलं आहे.
advertisement
8/9
तेजस्विनी पंडित ही मनसे पक्षाला पाठिंबा देते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार तिला पटतात. निवडणुकांच्या आधी तेजस्विनीनं अनेकदा राज ठाकरे यांना खुला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं आहे. 

9/9
मतदानाच्या एक दिवस आधी तिने राज ठाकरे यांची फोटो पोस्ट करत
मतदानाच्या एक दिवस आधी तिने राज ठाकरे यांची फोटो पोस्ट करत "मोठी लढाई लढू मातीसाठी रं गड्या, मनगटाचं जोर लावून.. तू आभाळ आभाळ, वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी", या गाण्याच्या ओळी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या.
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement