advertisement

IPL च्या चौथ्याच मॅचमध्ये ड्रामा! रोहित शर्माची कॉपी करायला केला राहुल तेवतिया, अंपायरने थेट ICC चा नियम दाखवला

Last Updated:

PBKS Vs GT, Rahul Tewatia Illegal Bat : जेव्हा वॉशिंग्टन सुंदर आऊट झाल्यावर तेवतिया बॅटिंगला आला. त्याने स्ट्राईक घेण्यापूर्वीच अंपायरने खेळ थांबवला आणि त्याच्या बॅटची 'बॅट गेज'द्वारे तपासणी केली.

 Umpire Changed Rahul Tewatia Illegal Bat
Umpire Changed Rahul Tewatia Illegal Bat
Umpire Changed Rahul Tewatia Illegal Bat : इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या चौथ्या मॅचमध्ये पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात कमालीचा थरार पाहायला मिळाला. ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली, ज्यामध्ये गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्जच्या कूपर कोनॉली याने दमदार कामगिरी करत गुजरातला पराभवाचं पाणी पाजलं. अशातच आता या मॅचमध्ये ड्रामा पहायला मिळाला. रोहित शर्माची कॉपी करायला गेलेल्या राहुल तेवतिया याच्यावर ऑन फिल्ड अंपायरने कारवाई केली.

ऑन फिल्ड अंपायरने बॅट तपासली

गुजरात टायटन्स टीमचा फिनिशर राहुल तेवतिया याला ऑन-फील्ड अंपायरने बॅटच्या आकारच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे मध्येच रोखले आणि त्याला तातडीने आपली बॅट बदलण्यास सांगितलं. तेवतिया मैदानात येताच अंपायरने तातडीने त्याची बॅट तपासली. ही बॅट नियमात न बसणारी असल्याने त्याला तातडीने बॅट बदलण्याचा इशारा देण्यात आला. ही घटना डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये घडली, जेव्हा वॉशिंग्टन सुंदर आऊट झाल्यावर तेवतिया बॅटिंगला आला. त्याने स्ट्राईक घेण्यापूर्वीच अंपायरने खेळ थांबवला आणि त्याच्या बॅटची 'बॅट गेज'द्वारे तपासणी केली.
advertisement
advertisement

आयपीएलमध्ये बॅट गेजचा वापर सक्तीचा

एप्रिल 2025 पासून आयपीएलमध्ये मॅच अधिकाऱ्यांकडून बॅट गेजचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. बॅट आणि बॉल यांच्यात योग्य संतुलन राखण्यासाठी आणि बॅटर्सना मोठ्या बॅटचा अनावश्यक फायदा मिळू नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वी रोहित शर्माच्या बॅटचीही अशाच प्रकारे तपासणी करण्यात आली होती, मात्र त्याने स्वतः अंपायरकडून गेज घेऊन बॅट योग्य असल्याचे सिद्ध केलं होतं. पण तेवतियानेही तसाच प्रयत्न केला, पण अंपायरने त्याचं म्हणणं खोडून काढलं होतं.
advertisement

माजी अंपायर अनिल चौधरी काय म्हणाले?

या प्रकरणावर माजी अंपायर अनिल चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, आयपीएलमध्ये गेल्या वर्षापासून हा नियम काटेकोरपणे पाळला जात आहे. साधारणपणे फोर्थ अंपायर प्रत्येक बॅटची तपासणी करतात, पण जर ते व्यस्त असतील किंवा मैदानात अचानक बॅट बदलली गेली, तर ऑन-फील्ड अंपायरला ती चेक करावी लागते, असं माजी अंपायर अनिल चौधरी यांनी म्हटलं आहे.
advertisement

नियम काय सांगतो?

दरम्यान, मेरिलबोन क्रिकेट क्लब'च्या (MCC) क्रिकेट नियम 5 नुसार, बॅटचा आकार निश्चित करण्यात आला आहे. बॅटच्या कडा (Edges) 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसाव्यात, बॅटची एकूण खोली 6.7 सेंटीमीटर आणि रुंदी 10.8 सेंटीमीटरपेक्षा जास्त असू शकत नाही. या नियमांचे उल्लंघन झाल्यास बॅटरला ती बॅट वापरता येत नाही.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL च्या चौथ्याच मॅचमध्ये ड्रामा! रोहित शर्माची कॉपी करायला केला राहुल तेवतिया, अंपायरने थेट ICC चा नियम दाखवला
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement