advertisement

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरवर आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, पंजाबच्या कॅप्टनला BCCI चा दणका! पण कारण काय?

Last Updated:

PBKS vs GT BCCI Action On Shreyas Iyer : न्यू चंदीगड येथील न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये पंजाबच्या टीमने स्लो ओव्हर-रेट (Slow Over-rate) राखल्याने बीसीसीआयने सर्वात मोठी कारवाई केली आहे.

BCCI Action On Shreyas Iyer has been fined 12 Lakhs
BCCI Action On Shreyas Iyer has been fined 12 Lakhs
Shreyas Iyer fined 12 Lakhs : आयपीएल 2026 च्या चौथ्या मॅचमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध विजय मिळवूनही पंजाब किंग्सचा (PBKS vs GT) कॅप्टन श्रेयस अय्यर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाब किंग्सने पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. मात्र आता श्रेयस अय्यर याच्या (Shreyas Iyer) अडचणीत बीसीसीआयने वाढ केली असून त्याला तब्बल 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल इतिहासातील श्रेयस पहिला कॅप्टन आहे, ज्याच्यावर एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

बीसीसीआयने सर्वात मोठी कारवाई

न्यू चंदीगड येथील न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये पंजाबच्या टीमने स्लो ओव्हर-रेट (Slow Over-rate) राखल्याने बीसीसीआयने सर्वात मोठी कारवाई केली आहे. मैदानावर निर्धारित वेळेत ओव्हर्स पूर्ण न केल्यामुळे श्रेयस अय्यरला आता दंड भरावा लागणार आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार (IPL Code of Conduct), किमान ओव्हर-रेट राखण्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मैदानात आलेलं वादळ आणि अर्शदीपच्या शेवटच्या ओव्हरमुळे मॅच वेळेत पूर्ण झाली नाही.
advertisement

कलम 2.22 अंतर्गत कारवाई

पंजाब किंग्सने स्लो ओव्हर रेटचा गुन्हा केल्यामुळे कलम 2.22 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. नियमांनुसार, पहिल्या चुकीसाठी कॅप्टनला ठराविक रकमेचा दंड ठोठावला जातो. जर आगामी मॅचेसमध्ये पंजाबकडून पुन्हा अशाच प्रकारची चूक झाली, तर हा दंड वाढू शकतो किंवा कॅप्टनवर बंदीची टांगती तलवार देखील असू शकते.
advertisement
advertisement

श्रेयस अय्यरला दुखापतीचं ग्रहण

दरम्यान, पहिल्याच मॅचमध्ये श्रेयस अय्यरला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. कूपर कॉनोली याने बॉल थेट श्रेयस अय्यरच्या हाताला लागला. त्यामुळे श्रेयस मैदानात कोसळल्याचं दिसलं. त्यानंतर तो पुन्हा बॅट हातात घेऊन बॅटिंग करू लागला होता. अशातच तो पुन्हा नीट होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरवर आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, पंजाबच्या कॅप्टनला BCCI चा दणका! पण कारण काय?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement