Jalna: मतदानासाठी घराबाहेर पडले, १५ मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, लहान मुलाचाही चावा

Last Updated:

Jalna Dog Attack: मतदानासाठी बाहेर पडलेल्या 15 जणांवर कुत्र्‍याने हल्ला केला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

जालन्यात मतदारांवर कुत्र्याचा हल्ला
जालन्यात मतदारांवर कुत्र्याचा हल्ला
रवी जैस्वाल, प्रतिनिधी, जालना : जालना शहरात मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या एका कुत्र्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात 10 ते 15 जण जखमी झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे.
गुरूवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास जालना शहरातील सरस्वती भुवन आणि शनी मंदिर परिसरात तसेच काली मज्जिद परिसरात मतदान करण्यासाठी बाहेर पडलेल्या काही मतदारांवर आणि नागरिकांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला.
एका मागोमाग एक या कुत्र्याने नागरिकांना चावा घेतला आहे. कोणाचे पायाचे लचके तोडले, तर एकाच्या हाताचा करंगळी तोडून या पिसाळलेल्या कुत्र्याने जखमी केले आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
मतदानासाठी बाहेर पडलो. मागून एक कुत्रा आला. बायकोला चावला. जवळपास १५ ते २० लोकांना कुत्र्‍याने चावा घेतला आहे. काही लहान मुलांना देखील कुत्र्‍याने जखमी केले आहे. सगळ्यांना दवाखाखान्यात आणले आहे, असे एकाने सांगितले.
तर कुत्र्‍याने हल्ला केलेल्या जखमींवर उपचार सुरू आहेत. जवळपास १२ ते १५ जखमींवर आम्ही प्राथमिक उपचार केले आहेत. अॅडमिट करून त्यांना इंजेक्शनही देतोय. जखमींची प्रकृती स्थिर आहे. फक्त एका रुग्णाचे एक बोट तुटले आहे. कुत्र्याने गंभीर रित्या चावा घेतलेला आहे, असे डॉ. आशिष देवडे , जिल्हा रुग्णालय जालना यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalna: मतदानासाठी घराबाहेर पडले, १५ मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला, लहान मुलाचाही चावा
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement