Numerology: जिथं जातील तिथं पहिल्या नंबरातच..! या जन्मतारखांच्या मुली कुटुंबाचं नशीब पालटतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: मूलांक 3 चा स्वामी गुरू ग्रह आहे, तो ज्ञान, बुद्धी, आणि समृद्धीचा कारक मानला जातो. यामुळेच मूलांक 3 असलेल्या मुलींमध्ये या ग्रहाचे काही विशेष गुण दिसून येतात. या मुली खूप आत्मविश्वासू आणि महत्त्वाकांक्षी असतात. त्यांच्यात काहीतरी मोठं करण्याची जिद्द असते आणि त्या ध्येयपूर्तीसाठी खूप मेहनत करतात. त्यांना स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या सोबतच मूलांक 3 असलेल्या मुलींच्या स्वभावामध्ये काही नकारात्मक पैलू देखील असू शकतात. कधीकधी त्यांच्यातील जास्त आत्मविश्वास गर्विष्ठपणात बदलू शकतो. तसेच, त्या जिद्दी आणि हट्टी स्वभावाच्या असू शकतात, ज्यामुळे त्यांना इतरांचे ऐकणे थोडे कठीण जाते. मात्र, एकूणच या मुली आपल्या मेहनतीने आणि ज्ञानाने आयुष्यात खूप यशस्वी होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)