Dandruff : कोंडा गायब करण्यासाठी घरगुती उपाय, केसांचं आरोग्य राहिल उत्तम
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
कोंडा कमी व्हावा यासाठी बरेच शाम्पू आणि उत्पादनांचा वापर केला जातो. पण अनेकांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. म्हणून आज काही घरगुती उपायांबद्दल माहिती करुन घेऊया.
मुंबई : कोंडा ही समस्या अनेकांना सतावते. कोंड्यामुळे केसांचं सौंदर्य, आरोग्य खराब तर होतोच पण केसांत खाज येणं, जळजळ होणं आणि केस गळणं यासारख्या समस्याही निर्माण होतात.
कोंडा कमी व्हावा यासाठी बरेच शाम्पू आणि उत्पादनांचा वापर केला जातो. पण अनेकांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. म्हणून आज काही घरगुती उपायांबद्दल माहिती करुन घेऊया.
नारळ तेल आणि लिंबू: नारळ तेलातील घटक टाळूला मॉइश्चरायझ करण्यास मदत करतात, तर लिंबाचा रस बुरशी नष्ट करण्यास मदत करू शकतो. दोन चमचे नारळ तेल गरम करा आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस घाला. आता हे तयार मिश्रण हलक्या हातांनी टाळूवर लावा आणि मसाज करा आणि तीस मिनिटांनी सौम्य शाम्पूनं धुवा.
advertisement
दही आणि मेथीचे दाणे: दही टाळूला आराम देण्यास मदत करू शकते आणि मेथीमधे बुरशीविरोधी गुणधर्म असतात. रात्रभर एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवा. सकाळी मेथीचे दाणे बारीक करून दह्यात चांगले मिसळा. ही पेस्ट तुमच्या टाळूला लावा आणि केस धुण्यापूर्वी तीस मिनिटं तसंच राहू द्या.
advertisement
कोरफडीचा गर: कोरफडीतल्या काही घटकांमुळे टाळू शांत होतो आणि मॉइश्चरायझ करण्यास मदत होते. कोरफडीच्या ताज्या पानांतून गर काढा आणि पाण्यानं धुण्यापूर्वी वीस मिनिटं टाळूला लावा. या उपायामुळे डोक्यातील कोंडा कमी होण्यास मदत होऊ शकते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 08, 2025 6:07 PM IST


